धाराशिव गुन्हा: राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून दिवसाढवळा हत्या, जीव जाईपर्यंत मारहाण, लैंगिक अत्याचार, बंदुकीचा धाक दाखवत दहशत, अपहरण अशा अनेक घटनांचं मराठवाडा केंद्रस्थान बनला आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातून (Dharashiv) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला आहे. शेतात पाणी देण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून जीव जाईपर्यंत मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून यात 3 पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पेढीवरील ही घटना असून मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटात प्रचंड मारहाण झाली. या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलं आहे. (Crime news)
या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येरमाळा पोलिसांनी दहा आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून वाशी तालुक्यातील बावी वस्तीतील या घटनेने तणावाचे वातावरण होते.
पाहूणा म्हणून आलेल्या 28 वर्षीय तरुणाने आळंदीतील शैक्षणिक संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आळंदीसह संपूर्ण परिसर हादरलाय. (Sexual Assault) पुण्यातील आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
अधिकची माहिती अशी की, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे शेत शिवारात 35 वर्षीय महिला बकऱ्या चारण्याकरीता जंगलात गेली होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने धार शस्त्राने मानेवर वार करून हत्या केल्याची घटना दोन दिवसा पूर्वी घडली होती…याप्रकरणी कारंजा पोलिसांनी तपासचक्र फिरवत गावातील रहीवासी संदिप गायकवाड हा व्यक्ती घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला.
हेही वाचा:
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
अधिक पाहा..