Bigg Boss 18 : मित्र की शत्रू? बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा तांडव, सदस्यांना एक चूक पडली महागात
Saam TV January 06, 2025 07:45 PM

सलमान खानचा 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18 ) शो आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे घरातील प्रत्येक सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित होण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन आठवड्याला सुरुवात होताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. नॉमिनेशन टास्क दरम्यान घरातील सदस्य नियमांचे उल्लंघन करतात.

नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या नियमांचे उल्लंघनामुळे एक टीम नॉमिनेट केले आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळाले की, विवियन डिसेना टाइम मशीनच्या खोलीत दिसतो आणि बाहेर करण वीर मेहरा असतो. करण विवियनला म्हणतो की,"'तू मित्र आहे की शत्रू, हे अद्याप कळलेले नाही. पण तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे." यावर डिसेना विचारतो की, "जर सॉफ्ट कॉर्नर आहे तर 'वीकेंड का वार'ला का नाही बोलास" म्हणजे अजूनही विवियन आणि करणमध्ये मित्र की शत्रू? हा गेम सुरू आहे.

प्रोमोमध्ये त्यानंतर करण सिंगसोबत बोलतो. करण म्हणतो, "मला माहित आहे की तू गेमर आहेस. तुझ्यासोबत स्टेजवर एखादा स्पर्धक असेल तर तो कोण असावा?" यावर ईशा उत्तर देत करणचे नाव घेते. हा ईशा आणि करणचा नवीन गेम प्लान आहे. की ही दोघे एकमेकांना क्रॉस करणार आहेत. हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरात टाइम मशीनच्या बाहेर अविनाश आणि ईशा असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चाहतला अविनाश विचारतो की, "चला हिरोबद्दल बोलू...तो कसा आहे?" यावर चाहत 'खूप छान' असे उत्तर देते. टास्कच्या नियमानुसार मागे बसलेल्या सदस्यांना वेळ मोजायची नसते. तरीही सदस्यांकडून वेळ मोजली जाते.

बिग बॉसच्या घरातून नुकतीच कशिश बाहेर पडली आहे. आता 'वीकेंड का वार'ला सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या टास्कमधून कोणती टीम नॉमिनेट झाली हे पाहायला प्रेक्षक आतुर आहेत. बिग बॉसचा गेम आता फक्त दोन आठवड्यांचा उरला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.