आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावणारा लोकप्रिय संगीतकार 'ए आर रेहमान'चा आज 58वा वाढदिवस आहे. नेहमी ए आर रेहमान (AR Rahman ) आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जातो. मात्र अलिकडेच तो आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. लग्नाच्या 30 वर्षांनी 'ए आर रेहमान'ने पत्नी सायरा बानूसोबत घटस्फोट घेतला आहे.
''ने आजवर अनेक चित्रपटांसाठी हिट गाणी गायली आहेत. त्याची गाणी कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य करतात आणि त्यांच्या भावना ओल्या करून जातात. गायकाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना जगातील कानाकोपऱ्यात आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याची गाणी आजच्या तरुण पिढीला खूप जास्त आवडतात.
'ए आर रेहमान' नेटवर्थ'ए आर रेहमान'चे परदेशात अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये 'ए आर रेहमान'चा स्वतःचा एक स्टुडिओ देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ए आर रेहमान'चे , लंडनमध्ये म्युझिक स्टुडिओ आहेत. चित्रपटात एका गाण्यासाठी ए आर रेहमान 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेतो. तर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी 3 ते 5 कोटी फी घेतो. त्याची अनेक शहरांमध्ये संपत्ती आहे.
'ए आर रेहमान'कडे आलिशान कार देखील आहेत. यात मर्सिडीज, जग्वार यांसारख्या कोटींच्या गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गायक 'ए आर रेहमान' तब्बल संपत्ती 2,000 कोटी रुपयांच्यावर आहे. तो जगातील श्रीमंत संगीतकारांपैकी एक आहे. तो अनेक ब्रँडसोबतही कनेक्ट आहे.