राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परेश चाळके यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर संबधित २४ वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी या युवकाने दिली आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. श्रीनगरमधील तरूणाने ही धमकी दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर पोलीस प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. कर्तव्यात कुचराई करणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई केली आहे. बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. देशमुख हत्येनंतर बीड पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली केली होती.