आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी 2025 स्पर्धेचं वेळापत्रक अवघ्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालंय. त्यानुसार 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यामुळे टीम इंडियाचे सामने हे सुरक्षिततेच्या कारणामुळे त्रयस्थ ठिकाणी यूएईत होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समितसमोर कुणाला संधी द्याची आणि कुणाला नाही? हे ठरणवं फार आव्हानात्मक असणार आहे. टीम इंडिया त्याआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवड होणाऱ्यांनाच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही संधी मिळेल, असं म्हटलं जात आहे.
जसप्रीत बुमराहला सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे बुमराहला दुसऱ्या डावात बॉलिंग करता आली नव्हती. त्यामुळे बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी उपकर्णधारपदाच्या भूमिकेत दिसू शकतो, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराहला दुखापतीतून पूर्णपणे फिट झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी उपकर्णधारपदाच्या भूमिकेत असू शकतो. आता बुमराहची दुखापत कशी आहे? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. बुमराहला पाचव्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. बुमराहने या दुखापतीनंतर आवश्यक तपासणी करुन घेतली आणि स्टेडियममध्ये परतला. मात्र बुमराहला मैदानात परतता आलं नाही.
बुमराहला उपकर्णधारपद मिळणार!
दरम्यान जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. बुमराहने या 5 सामन्यांच्या मालिकेत 32 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने बॅटिंगनेही निर्णायक कामगिरी केली होती. बुमराहने या 5 पैकी 2 सामन्यात नेतृत्व केल. बुमराहने त्यापैकी टीम इंडियाला पर्थमध्ये विजय मिळवून दिला. बुमराह यासह ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे याच्यानंतर पहिल्याच सामन्यात विजयी करणारा दुसरा कर्णधार ठरला. तर सिडनीत सहकाऱ्यांची अचूक साथ न लाभल्याने भारताला पराभवासह कसोटी मालिका गमवावी लागली.