गेल्या काही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियात बरीत उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म नसल्याने सध्या चिंतेचा विषय आहे. असं असलं तरी रोहित शर्माच्या खांद्यावर धुरा असणार यात काही शंका नाही. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार असून भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला संघाची घोषणा केली जाणार आहे. दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2019 नंतर पहिल्यांदा खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे पहिलाच सामना 12 जानेवारी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेत दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. 12 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या दिव्यांग संघाची घोषणा झाली असून यात 17 खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारतीय दिव्यांग क्रिकेट परिषदेचे राष्ट्रीय निवड पॅनलने मुख्य प्रशिक्षक रोहित जलाने याच्या नेतृ्त्वात जयपूरमध्ये प्रशिक्षण शिबीर घेतलं होतं. प्रशिक्षणानंतर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा विक्रांत केनीच्या खांद्यावर आहे. तसेच उपकर्णधार म्हणून रविंद्र सँटेकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रोहित जलानी यांनी सांगितलं की, ‘ही एक संतुलित टीम आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांचा सामना करण्यास सक्षम आहे.’ भारत पाकिस्तान यांच्यात पहिला सामना 12 जानेवारीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 13 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध, 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध, 16 जानेवारीला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध, 18 जानेवारीला इंग्लंड आणि 19 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जानेवारीला होणार आहे.
विक्रांत रवींद्र केनी (कर्णधार), रवींद्र गोपीनाथ सांते (उपकर्णधार), योगेंद्र सिंग (यष्टीरक्षक), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंग (यष्टीरक्षक), आकाश अनिल पाटील, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, रवींद्र सिंग (यष्टीरक्षक). निखिल मनहास, आमिर हसन, माजिद मगरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र.