HMPV Virus : महाराष्ट्राच्या वेशीवर; कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्ये सापडला रूग्ण; राज्य सरकार अर्लट
Sarkarnama January 06, 2025 10:45 PM

Pune News : कोरोनाच्या महामारीनं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. या घटनेला दोन एक वर्ष होत असत असून कोरोनाच्या काळ्या आठवणीही लोक काढणे पसंत करत नाहीत. कोरोनाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या हृदयात चर्ररर होते. अशावेळी चीनमधून आलेला HMPV हा कोरोना सदृष्य असणारा विषाणू राज्याच्या वेशीवर आला आहे. कर्नाटकात दोन रूग्ण सापडले असून गुजरातमध्ये देखील एक रूग्ण बाधित झाला आहे. देशात सध्या तीन रूग्णांना ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाली आहे.

गेल्या वेळी चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता. आता पुन्हा एकदा जगावर HMPV व्हायरसचं काळे मळभ आले असून त्याचा प्रसार चीनमधून होताना दिसत आहे. सध्या चीनमध्ये नव्या व्हायरसनं डोकं वर काढलं असून तेथे HMPV व्हायरसनं धुमाकूळ घातल आहे. चीनमधील बऱ्याच लोकांना या व्हायरसची लागण झाली असून भारतात देखील HMPV व्हायरस दाखल झाला आहे. तर राज्याच्या वेशीवर HMPV व्हायरस पोहचल्याने राज्याची आरोग्य यंत्राणा अलर्टमोडवर आली आहे.

कर्नाटक आणि गुजरातमध्ये रूग्ण

राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नका, असे आवाहन नागरीकांना केले असून महत्त्वाचे नियम देखील लागू केले आहेत. HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडले असून पहिला रुग्ण बंगळूरूतील 8 महिन्यांचे चिमुकली मुलगी आहे. तर दुसरा रुग्ण तीन महिन्यांचं कर्नाटकमधील 3 महिन्यांचे लहान बाळ आहे. गुजरातमध्ये देखील एका रूग्णाची नोंद झाल्याची माहिती ICMR ने माहिती दिली आहे. सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका : आरोग्यमंत्री

दरम्यान या नव्या व्हायरसवर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी राज्य सरकार प्रत्येक नागरिकांची चांगली काळजी घेईल. येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक घेतली जाणार आहे. बैठकीत या HMPV व्हायरसवर चर्चा केली जाईल आणि काळजी बद्दलचे निर्देश दिले जातील. यामुळे राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आबिटकर यांनी केले आहे.

दोन वर्षांआधी कोरोना पीकवर होता

2020, 2021 आणि 2022 मध्ये जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला होता. कोरोना जगभर पसरत होता. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी घोषीत केलं होतं. ७ जानेवारी २०२२ ला कोरोना पीक स्वरूपाला आला होता. यावेळी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर आता दोन वर्षांनतर पुन्हा एकदा कोरोना सदृष्य नव्या विषाणूने डोक वर काढल्याने जगाची चिंता वाढली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.