Why Stock Market Crash Today: शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीसह सुरुवात झाली होती. दरम्यान, काही काळ दोन्ही निर्देशांक वधारले आणि बीएसई सेन्सेक्स 280 अंकांच्या वाढीसह व्यवहार करताना दिसत होता, तर एनएसई निफ्टी 85 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता, परंतु व्यवहाराच्या दोन तासांतच परिस्थिती बदलली.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 849.50 किंवा 1.07% च्या मोठ्या घसरणीसह 78,373.61 च्या पातळीवर घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील तो 266.50 अंक किंवा 1.11% घसरून 23,738.25 च्या पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले.
आज सेन्सेक्स निर्देशांक 79,281.65 च्या पातळीवर उघडला आणि काही मिनिटांतच तो 280.17 अंकांच्या वाढीसह 79,503 च्या पातळीवर पोहोचला. यासोबतच निफ्टीही 24,045.80 च्या पातळीवर उघडला आणि 24,087.75 च्या पातळीवर गेला.
कोणते शेअर्स घसरले?शेअर बाजारात अचानक झालेल्या या घसरणीदरम्यान, टाटा स्टीलचा शेअर सर्वात जास्त घसरला, बातमी लिहिपर्यंत तो 3.62% घसरत 133.30 रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय कोटक बँकेचा शेअर 2.57%, पॉवरग्रिड शेअर 2.10%, एशियन पेंट्स शेअर 2%, अदानी पोर्ट्स शेअर 2% ने घसरला.
BSE च्या 30 शेअर्सपैकी 24 लार्ज कॅप कंपन्या लाल रंगात व्यवहार करत होत्या. घसरलेल्या इतर मोठ्या शेअर्समध्ये M&M, NTPC, नेस्ले इंडिया, झोमॅटो, HDFC बँक, रिलायन्स, SBI, ITC, भारती एअरटेल, टाटा मोटर्स आणि TCS यांचा समावेश आहे.
मिडकॅपमध्ये सर्वात जास्त घसरलेल्या शेअर्समध्ये फ्लोरोकेम शेअर (4.90%), IREDA शेअर (4.27%), हिंदुस्तान पेट्रोलियम (4.18%), NHPC शेअर (4%) आणि ऑइल इंडिया शेअर (3.74) यांचा समावेश आहे.