दिव्यांग प्रवाशाला रेल्वेत चढता येईना, केली दरवाज्याची मोडतोड; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा प्रशासनावर निशाणा
Times Now Marathi January 07, 2025 05:45 PM

Indian Railway: सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी एक दिव्यांग प्रवाशी चक्क रेल्वेचा दरवाजा तोडताना दिसतो आहे. त्यामुळे त्याच्यावर काहीजणं नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच त्याने असा प्रकार केल्याने नक्की अधिकारी कुठे होते, त्याला थांबवले का नाही, असा प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. परंतु काहींना रेल्वेवरच निशाणा साधला आहे. काही म्हणाले की, अशाप्रकारे तो असूनही त्याला कोणी रेल्वेत घेत नाहीये हे फारच दुर्दैवी आहे. त्यामुळे अशावेळी तिकीट काढूनही त्याला हा त्रास सहन करावा लागतोय. हे पाहून अनेकांचा राग अनावर झाला आहे.

त्याचसोबत यावेळी रेल्वेस्थानकावर उभे असलेले लोक मात्र त्याची मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. ट्रेनच्या मालमत्तेचे अशाप्रकारे नुकसान करणे चुकीचे आहेच पण तिकीट काढूनही ट्रेनमध्ये चढायला न मिळणे किंवा अशाप्रकारे दरवाजा बंद करून ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल लोक आता रेल्वे प्रशासनाला विचारत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती मागवून घेतली आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकावर ट्रेन उभी असल्याचे दिसतेय. ही ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. एवढी गर्दी आहे की, प्रवाशांनी इतर लोकांना चढण्यापासून रोखण्यासाठी आतून चक्क दरवाजे बंद करून घेतले आहेत. अशा परिस्थितीत तिथे एक दिव्यांग प्रवासी येतो आणि तो दरवाजा उघडण्यास सांगतो. परंतु कोणीही त्याच्या मदतीसाठी जात नाही. त्याला आत जाता यावे म्हणून तो दरवाजा तोडायला लागतो. त्याच्या कुबड्यांच्या आधारे तो दरवाजा तोडतो. इतक्यात पोलिस तिथे पोहोचतात आणि ते समजावून त्याला बाजूला जाण्यास सांगतात. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.


@rishbagree नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, ''मी काही बोललो तर वाद होईल.'' दुसऱ्याने लिहिले की, ''लोक कोणत्याही भीतीशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कसे करतात, असा माझा प्रश्न आहे; अशा लोकांकडून पैसे वसूल केले जावेत,'' काही युजर्सनी अशा लोकांना तुरुंगात टाकून अद्दल घडवण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे तर काहींनी आतून दरवाजा बंद केलेल्या लोकांचा दोष आहे. आता हा दिव्यांग माणूस ट्रेनमध्ये कसा चढणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.