Leo Dry Fruits and Spices IPO Listing : आयपीओ गुंतवणूकदारांना मिळाला 30 टक्के नफा, कंपनीचे व्यावसायिक आरोग्य मजबूत
मुंबई
: मसाल्यांची विक्री करणाऱ्या लिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइसेसच्या शेअर्सची आज बीएसई एसएमईवर दमदार लिस्टिंग झाले. मात्र, त्यानंतर नफा बुकिंगमुळे शेअर्स कोसळले. लिओ ड्राय फ्रूट्सचा शेअर्स बीएसई एसएमईवर 68 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमध्ये शेअर्सची किंमत 52 रुपये हाेती. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांना 30.77 टक्के लिस्टिंग फायदा झाला आहे. मात्र, शेअर्स कोसळल्याने आयपीओ गुंतवणूकदारांचा आनंद लवकरच मावळला. तो 64.60 रुपयांपर्यंत घसरला.
आयपीओला जोरदार प्रतिसादलिओ ड्राय फ्रूट्स अँड स्पाइसेसच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एकूण 181 पट बोली मिळाली. कंपनीचा 25.12 काेटी रुपयांचा कोटीचा आयपीओ 1 ते 3 जानेवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आरक्षित भाग 68.06 पट भरला गेला. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) हिस्सा 394.59 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा 154.5 पट भरला गेला. आयपीओमध्ये 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 48.30 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. कंपनी या शेअर्सद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा, विपणन आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी करेल.
लिओ ड्राय फ्रूट्सबद्दलनोव्हेंबर 2019 मध्ये स्थापन झालेली लिओ ड्रायफ्रुट्स आणि स्पाइसेस ट्रेडिंग, वंदू या ब्रँड नावाखाली ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय करत आहे. तर फ्रोझन आणि सेमी फ्राइड उत्पादनांचा 'FRYD' ब्रँड आहे. कंपनीचा व्यवसाय B2B, B2C आणि D2C विभागांमध्ये आहे.
कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 7.9 लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.63 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.64 कोटी रुपये झाला. या कालावधीत, कंपनीचा महसूल वार्षिक 243 टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दराने (CAGR) वाढून 62.27 कोटी रुपये झाला. कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल-सप्टेंबर 2024 च्या पहिल्या सहामाहीत, 1.87 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 17.88 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.