आजकाल बहुतांश लोकं पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कारला जास्त पसंती देत आहेत. अशापरिस्थितीत तुम्हीही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी ठरू शकते. कारण टाटा नेक्सॉन ईव्हीने त्याच्या नवीन कारच्या अप्रतिम डिझाइनमुळे ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्याचबरोबर या कारचे यश पाहून कंपनीने त्यांच्या ग्राहकांना मोठी भेट देण्याचा विचार केला आहे. खरं तर कंपनीने टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीवर ३ लाख रुपयांपर्यंत सूट देण्याचे ठरवले आहे. स्टॉक क्लिअरिंग अंतर्गत तुम्हाला या सवलतीचा फायदा मिळू शकतो. रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक कारचे उत्पादन जास्त झाल्यानंतर डीलरशिपवर उभ्या राहिलेल्या मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट दिला जातो. अशावेळी सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर डीलरशिपशी संपर्क साधू शकता. यानंतर तुम्ही या टाटा नेक्सॉनचे वेगवेगळे मॉडेल्स वेगवेगळ्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करू शकता. टाटा नेक्सॉन ईव्हीची वैशिष्ट्ये आणि इतर तपशीलांबद्दल जाणून घ्या.
टाटा नेक्सॉन ईव्ही रेंज आणि फीचर्स
टाटा नेक्सॉन ईव्ही या कारच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर ती तुम्हाला सिंगल चार्जमध्ये ४६५ किमीची रेंज देऊ शकते. ईव्ही केवळ 8.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या कारमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचा पर्याय मिळतो. ही कार फुल चार्ज होण्यासाठी केवळ ५६ मिनिटे लागतात.
या कारमध्ये कंपनीकडून अतिशय उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीचे डिझाईन चांगले करण्यात आले आहे. याचा फ्रंट पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. यासोबतच कारमध्ये डीआरएलसह एलईडी स्प्लिट हेडलॅम्प सेटअप देखील देण्यात आला आहे, ज्याच्या खाली हेडलॅम्प क्लस्टर आहे. त्याचबरोबर या कारमध्ये एलईडी लाईट देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही कार अतिशय आकर्षक दिसते. सुरक्षिततेत या कारला 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे लोकांना ही कार खूप आवडत आहे.
टाटा नेक्सॉन ईव्हीमध्ये तुम्हाला V2V चार्जिंग फीचरचा फायदा मिळतो. म्हणजेच इतर कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या चार्जरने तुम्ही ते सहज चार्ज करू शकता. याशिवाय कार चार्ज करण्यासाठी V2L टेक्नॉलॉजीचाही वापर करू शकता. यामध्ये तुम्ही गॅझेटच्या मदतीने कार चार्जही करू शकता.
टाटा नेक्सॉन ईव्ही किंमत
टाटा नेक्सॉन ईव्हीची सुरुवातीची किंमत 12.49 लाख रुपये आहे. याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 17.19 लाख रुपयांपर्यंत आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत वेगवेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपवर जाऊन कारची किंमत आणि सवलतीची संपूर्ण माहिती मिळवू शकता.