वास्तुशास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे. लोक दैनंदिन जीवनात याचे पालन करतात, ज्यामुळे त्यांना बरेच फायदे मिळतात. घराची रचना कशी असायला हवी, घरात कोणत्या वस्तू ठेवायला हव्यात या सर्व गोष्टी वास्तुशास्त्राच्या मदतीने निश्चित केल्या जातात. ऑफिससाठीही असे वास्तु नियम तयार करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑफिसमध्ये कोणत्या वास्तू नियमांकडे लक्ष द्यायला हवे याविषयी जाणून घेऊयात.
कामाच्या ठिकाणी चांगल्या कामगिरीसाठी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर गणपतीची मूर्ती ठेवू शकता. यासोबतच मानसिक शांती मिळवण्यासाठी गौतम बुद्धाची मूर्तीदेखील ठेवता येऊ शकेल. यातून तुम्हाला बरेच लाभ मिळू शकतात.
– जाहिरात –
झाडेझुडपे केवळ ताजेपणा निर्माण करत नाहीत तर वास्तु नियमांनुसार त्यांना ऑफिसच्या डेस्कवर ठेवणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर बांबू, तुळस आणि मनी प्लांट यांसारखी रोपे ठेवू शकता. यामुळे वातावरणही सकारात्मक राहते आणि तुमची कार्यक्षमता देखील वाढते. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी ताजी फुलेही पाण्यात ठेवता येऊ शकतील.
– जाहिरात –
येत्या वर्षभरात तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर क्रिस्टल बॉल ठेवू शकता. ती ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. यामुळे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि राहून गेलेली कामंही लवकर पूर्ण होतील. याशिवाय, चांगल्या परिणामांसाठी तुम्ही तुमच्या डेस्कवर धातूचे कासव, पिरॅमिड आणि घड्याळ इत्यादी देखील ठेवू शकता.
वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या ऑफिसच्या डेस्कजवळ अजिबात ठेवू नयेत, अन्यथा तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम मिळू शकतात. अशा स्थितीत तुमच्या डेस्कवरून थांबलेले घड्याळ, वाळलेली फुले, निरुपयोगी कागदपत्रे आणि जुन्या फाइल्स इत्यादी वस्तू काढून टाका. कारण या गोष्टी नकारात्मकतेला प्रोत्साहन देतात.
हेही वाचा : Sweater Hacks : जुन्या स्वेटरपासून बनवा मोजे ते बॉटल कव्हर
संपादन- तन्वी गुंडये