शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी रिअल लाइफमध्ये लग्नगाठ बांधली आहे.
Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriageशिवानी आणि अंजिक्य यांची पहिली भेट तू जिवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्या दोघांची लव्हस्टोरीही मालिकेपासूनच सुरु झाली.
Shivani Surve-Ajinkya Nanawareमालिका संपल्यावर त्यांच्या भेटी वाढल्या. त्यांची मैत्री झाली. मैत्रीनंतर यांचे रुपांतर प्रेमात झाले.
Shivani Surve-Ajinkya Nanaware२०१५-१६ मध्ये शिवानी सुर्वे आणि अंजिक्य ननावरे यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली.
Shivani Surve-Ajinkya Nanawareशिवानी आणि अंजिक्य यांनी २०१७ मध्ये लगेचच त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. परंतु त्यांच्या कुटुंबाचा नात्याला विरोध झाला.
Shivani Surve-Ajinkya Nanawareपरंतु शिवानी आणि अंजिक्य यांनी आपला निर्णय पक्का केला होता.त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला एकत्र राहून दाखवा, मगच आम्ही तुमच्या नात्याला परवानगी देऊ. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
Shivani Surve-Ajinkya Nanawareशिवानी आणि अंजिक्य लॉकडाउनमध्ये एकत्र राहिले.त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली. २०२४ मध्ये त्यांनी आपले नात्याला पुढे नेले. त्या दोघांनी मागच्या वर्षी लग्नगाठ बाधली.