सध्या अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच फेम अभिनेताने लग्नगाठ बांधली आहे. मराठमोळा अभिनेता सनीभूषण मुणगेकरने लग्न केलं आहे. नवीन वर्षाची नवी सुरूवात सनीभूषने केली आहे. सोशल मीडियावर सनीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सनीभूषणच्या पोस्टवर चाहत्यांकडून वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनेता सनीभूषणने इन्स्टाग्रामवर नुकतेच लग्नसोहळ्यातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. सेल्फी काढताना सनीभूषण नववधूसोबत दिसत आहे.दोघांनीही लग्नानिमित्त खास मराठमोळा लूक परिधान केला आहे. डोक्याला मुंडावळ्या अन् गालावर गोड हसू पाहून या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या फोटोंना त्याने "स्वप्नवत सत्यात... श्री व सौ मुणगेकर असं कॅप्शन दिलं आहे."
कोण आहे सनीभूषणची पत्नी?
सनीभूषण मुणगेकरने अभिनेत्री दिपश्री कवळेशी लग्नगाठ बांधली आहे. दिपश्रीने अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. बाळुमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेतून ती लोकप्रिय झाली. जागो मोहन प्यारे या मालिकेमध्येही दिपश्रीने भूमिका साकारली आहे.