सांगली पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करणे बाबत अधिकारी यांच्या सोबत आमदार डॉ सुरेश खाडे यानी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता यावेळी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला. आणि 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश अधिकारी यांना दिले आहेत. तर सर्व पाजर तलाव भरून घेण्याची आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. याचा लाभ शेतीसाठी शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभ धारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
maharashtra cabinet : आजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभआजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभ
बैठकीतील प्रस्तावांचे टीपण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करुन दिली जाणार
मंत्र्यांना प्रस्तावाला आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास तशीही व्यवस्था असणार
दरम्यान, आज पूर्णपणे ई-कॅबिनेट होणार नसून चाचणी म्हणून टॅब देत प्रयोग होणार
ई-कॅबिनेटवर पूर्णपणे शिफ्ट होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी लागणार
ई-कॅबिनेटची ही संकल्पना एनआयसीच्या मदतीने राबवली जाणार
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ई-कॅबिनेटची संकल्पना राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर
Pune News : पुण्याच्या भोरमध्ये नगर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीमभोर शहरातल्या रस्त्यावरील वहीवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेनी हटवली
नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं केली कारवाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी स्वतः कारवाईवेळी उपस्थित राहत कर्मचऱ्यांकडून करवून घेतली कारवाई..
यावेळी काही नागरीकांनी विरोध केल्यामुळं काहीकाळ तणावही निर्माण झाला होता
वहीवाटीसाठी अडचण ठरणारी अतिक्रमणं नगरपालिकेनी हटवल्यानं शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास..
Nashik News : नाशिकच्या निफाडमधील पारा घसरला- नाशिकच्या निफाडमधील पारा घसरला
- आज निफाडचा पारा ९.३ अशांवर
- येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
- वाढत्या थंडीनं द्राक्ष बागायतदार धास्तावला
- वातावरणात झालेला बदल शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा
- तर नाशिकमध्ये १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Solapur : ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर टीका- ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर टीका
- संजय गायकवाड म्हणजे गद्दार गटातील पिसाळलेला आमदार आहे
- संजय गायकवाड मुळात तू 50 खोक्यावर विकला जाऊन शेण खाण्याचे काम केले
- संजय गायकवाड म्हणजे तमाशातील नाच्या आहे
- त्यामुळे मतदारांना नावे ठेवण्याची तुझी लायकी नाही
Solapur News :सोलापूरकरांना विमानप्रवासासाठी आणखी दोन महिने करावी लागणार प्रतीक्षायेत्या 2 महिन्यात शंभर टक्के विमानसेवा सुरु होणार असल्याचा आमदार देवेंद्र कोठे यांचा दावा
मागच्या कांही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहे सोलापूरची विमानसेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ स्वतः लक्ष घालून विमानसेवेसाठी प्रयत्न करत असल्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सोलापूर विमानतळाचे करण्यात आले होते उदघाटन
Dharashiv : परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे रेडकावर बिबट्याचा हल्लापरंडा तालुक्यातील कांदलगाव येथे बिबट्याने म्हशीच्या रेडकावर हल्ला केल्याची घटना घडली,यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही नागरिक करत आहेत.गेल्या दोन अडीच महिन्यापासून भूम, परंडा, वाशी, कळंब, धाराशिव तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे,त्यामुळे पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही अशी परिस्थिती आहे त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
Washim : वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १६ जानेवारीला संपुष्टात येणारवाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, तसेच सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १६ जानेवारीला संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना मुदतवाढ दिली जाईल का, की प्रशासकांची नियुक्ती केली जाईल, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. अनेकांनी मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी, शासन स्तरावर अजून याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या निर्णयामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या कामकाजावर आणि ग्रामीण भागातील विकास योजनांवर कसा परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Live Update : फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून दोन भाजपच्या महिला नगरसेविका भिडल्याफेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा पेटला,चार दिवसापूर्वीच मिरारोडमध्ये फेरीवाल्या गुंडाकडून एकचा गोळी मारून हत्या करण्यात आली
गोळीबारची घटना ताजी असताना,फेरीवाल्या मुद्द्यावरून दोन नगरसेविका मध्ये चांगलीच जुंपली
मिरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मध्ये भर रस्त्यात शिवीगाळ
भाजपच्या दोन्ही नगरसेविकेची एकमेकांन विरोधात नया नगर पोलिस ठाण्यात तक्रार
Nashik : नाशिक महापालिकेतील ५५ कोटींचं भूसंपादन प्रकरण- ५५ कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनाचे चौकशी करण्याचे आदेश
- नाशिक महानगरपालिका देणार अहवाल
- माजी आयुक्तांसह काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता
- बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी रातोरात ५५ कोटी रुपयांचे धनादेश काढल्याचा ठपका
- तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या अडचणीत वाढ
- शासनाने सविस्तर अहवाल मागवत दिले चौकशीचे आदेश
- भाजपा आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशीची केली होती मागणी
- प्रकरणाच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या सादरीकरणाचे शासनाकडून आदेश
weather update : बुलढाणा जिल्ह्यातील पारा घसरला.. कडाक्याची थंडी.बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला असून आज 9 अंशावर आला आहे त्यामुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे... थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार असेलही मात्र मानवी शरीरावर यांचा विपरीत परिणाम होता आहे.. सर्दी खोकला ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहे. HMVP नावाचा व्हायरस पुढे आला आहे त्याची भीती लोकामध्ये वाढली आहे
Pune Live News : पुण्यातील पाच शिवसेनेचे नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणारविशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट असे एकूण शिवसेनेचे 5 नगरसेवक व शिवसैनिक कार्यकर्त्यासह दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशमुंबई अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, मा. चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर अण्णा मोहोळ तसेच पुण्यातील सर्व आमदार आणि शहर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश करणार
Palghar News : आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभारपालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभार हा दिवसेंदिवस समोर येतोय . त्यातच आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर मधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे . या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा निर्मितीच्या दहा वर्षानंतर ही पालघर मधील आरोग्यवस्था आजही खिळखिळी असल्याच समोर आल असून आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत असल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे .
Maharashtra Live Update: ऑलिव्ह रिडले कासवाची 20% घरटी महाराष्ट्रातडेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानूसार २०२३-२४ मध्ये देशभरातील ऑलिव्ह रिडले कासवाच्या सर्वेक्षणानुसार 20 टक्के कासवांची घरटी ही महाराष्ट्रात आढळलीत.तसा अहवाल देखील वनविभागाला देण्यात आलाय.त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर याठिकाणी ही घरटी सर्वाधिक आढळलीयत. राज्यातील समुद्रकिनारा असलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा अभ्यास करण्यात आला होता त्यात ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अधिक आढळली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी ही घरट्यांची मुख्य स्थळे असल्याचेही भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात म्हटलेय.
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर पिकविम्यासाठी पुन्हा आक्रमकबुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या 70 हजार 831 शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'त्या' शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233 कोटी 83 लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी रविकांत तुपकरांनी लावून धरली आहे.
Pune Latest News : ८ हजार ३१६ शाळांची नोंदणीआरटीई अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात ८ हजार ३१६ शाळांनी नोंदणी केली असून एकुण १ लाख १ हजार ४७४ प्रवेश आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवलेले असतात. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते.
यंदा प्रवेश प्रक्रिया लवकर म्हणजेच डिसेंबर मध्येच सुरु करण्यात आली आहे. १८ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांच्यी नोंदणीसाठी आरटीई पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात राज्यातील एकूण ९ हजार १३८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १ लाख २ हजार ४३४ जागा उपलब्ध झाल्या होत्या.
Pune News : पुणे महापालिका बांधणार चार हजार घरेपंतप्रधान आवास योजनेतून आर्थिक दृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी २ हजार ९१८ घरे बांधल्यानंतर आता दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरु केली आहे.
या नव्या योजनेत शहराच्या बाणेर, कोंढवा, धानोरी, हडपसर येथे बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये घर मिळणार आहे. महापालिकेने ४ हजार ६० घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी महापालिकेला सुमारे ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
Pune Election : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकामहापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांची मुदत संपल्याने तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागातील छोट्या छोट्या समस्याही सुटणे अवघड झाले आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
Pune Live News : पुणे महापालिकेने तयार केला ५० खाटांचा विलगीकरण कक्षदेशात एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरु केल्या आहेत.
रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे. पण महापालिकेने दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरु केलेली नाही.त्यामुळे या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.
Pune News : वाहतूक पोलिसांचा पीएमपी चालकांना दणकानियमांचे उल्लंघन करणाऱ्या 877 चालकांना दहा लाखाचा दंड
निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे,सिग्नलचे उल्लंघन,ओव्हरटेक करणे आधी विविध कारणासाठी वाहतूक पोलिसांनी पीएमपीच्या 877 चालकांना सुमारे दहा लाखात रुपये साधारण आकारला आहे
या पीएमपीच्या भाडेतत्त्वाचे बचालक असून त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात केली जाणार आहे
weather update : आणखीन दोन दिवस थंडीचा जोर राहणारउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा जोर वाढवून, राज्यात पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात दाट धुके आणि थंडीची लाट आहे. हिमालयात होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात दाट धुकेही पडत आहे.
Pune Live News Update : 122 साखर कारखान्यांकडे 1 हजार 685 कोटी रुपये थकीतराज्यातील यंदाच्या 2024-25 च्या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1 हजार 685 कोटी रुपये थकीत आहेत. शेतकर्यांना 1 हजार 163 कोटी रुपये मिळाले आहेत.तर 30 कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
साखर आयुक्तालयाच्या 15 डिसेंबर अखेरच्या पंधरवडा अहवालानुसार राज्यात 152 साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होता.त्यांनी सुमारे 85.13 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. ऊस तोडणी वाहतूक खर्चासह देय एफआरपीची रक्कम 2 हजार 848 कोटी रुपये होती. त्यापैकी शेतकर्यांच्या बँक खात्यावर कारखान्यांनी 1 हजार 163 कोटी रुपये जमा केलेले आहेत. म्हणजेच देय एफआरपीच्या सुमारे 40.84 टक्के रक्कम शेतकर्यांना मिळाली आहे. मात्र, अद्यापही 1 हजार 685 कोटी रुपये थकीत असल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याची होणार आर्थिक गणनायवतमाळ जिल्ह्याची 2025 - 26 ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समन्वय समितीचे स्थापन करण्यात आली असून या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाणार आहे.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीत एकूण 18 सदस्य असणार आहे त्यात सह अध्यक्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे.
Tuljapur News : तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळीतुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज शाकंभरी महोत्सवाला सुरुवात झाली दरम्यान देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली आहे.भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाईट काढत मूळ दगडांना ब्रशिंग व सेंड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लुक देण्यात आलेला आहे.पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मुंबईतील सवानी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे.
Tuljapur News : मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज सिंहासनावर विराजमानमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची आठ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे.देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून 14 तारखेपर्यंत हा शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे त्यामुळे देवीचे सिंहासन व संपुर्ण गाभारा गोमुख तिर्थाने धुवुन घेण्यात आला व त्यानंतर पहाटे विधिवत पुजा करून तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा छोटा दसरा असतो त्यासाठी आज दुपारी घटस्थापना करत विधिवत पूजा केली जाते.
Bachu kadu News : अमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज आंदोलनअमरावतीत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज वाडा आंदोलन
महादेव जानकर सुद्धा आंदोलनात होणार सहभागी
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या,मेंढपाळ धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी बच्चू कडू आक्रमक
सकाळी 11 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार आंदोलन
राज्य सरकार विरोधात बच्चू कडू यांचे विधानसभा निवडनुक नंतर पहिलंचं आंदोलन
अमरावती विभागीय आयुक्त कार्याललयावर असणार पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त
Latur News : आज संपूर्ण लातूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनबीड येथील सरपंच संतोष देशमुख तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण लातूर जिल्हा भरामध्ये ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे... जिल्हाभरातील प्रमुख महामार्गावर हे चक्काजाम आंदोलनाच आयोजन करण्यात आले आहे... सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे
Maharashtra Live Update: लाडके भाऊ होणार बेरोजगार,फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कालावधी संपणारमहायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 22 हजार 565 युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून शासकीय विभागांमध्ये नियुक्ती दिली त्यामुळे या प्रशिक्षणार्थींना दरमहा दहा हजार रुपये मानधान सुरू झाले मात्र सहा महिन्याचा कालावधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार असून लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.मुद्दत वाढ देण्याची मागणी लाडके भाऊ करताहेत.