जेजुरी, ता. ७ : पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीची (टीडीएफ) त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी सोमनाथ भंडारे यांची तर सचिवपदी तानाजी झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय जैन संघटना हायस्कूल वाघोली येथे पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीची सर्वसाधारण सभा झाली. सभेमध्ये त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे सचिव केरुभाऊ ढोमसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, पुणे विभाग शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे यांनी काम पाहिले. या सभेसाठी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे मावळते अध्यक्ष वसंतराव ताकवले, पुणे जिल्हा टीडीएफचे मुरलीधर मांजरे, महिला संघाच्या अध्यक्षा स्वाती उपार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अनिल साकोरे उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी - कार्याध्यक्ष - किशोर दरेकर, राज्य प्रतिनिधी - मुरलीधर मांजरे (खेड), प्रदीप गाढवे (जुन्नर), रामचंद्र नातू (दौंड), उपाध्यक्ष - सुनील ताकवणे (दौंड), सुनील आदलिंग (इंदापूर), अंकुश कुडपणे, रमेश ढोमसे (जुन्नर), कोषाध्यक्ष - सुनील वीर (भोर), आय व्यय निरीक्षक - मुकुंद भिसे, वार्तापत्र संपादक - राजेंद्र बोधे (हवेली), प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ता - मीनानाथ पानसरे (जुन्नर), सहकार्यवाह - एकनाथ टोपे(खेड), मनोहर खुणे (मावळ), अविनाश दराडे (आंबेगाव), सहकोशाध्यक्ष - विजय मोहिते (वेल्हे), गणेश मांढरे(शिरूर), सह आय व्यय निरीक्षक - विश्वनाथ दामगुडे (भोर), रावसाहेब वाघ (मुळशी), सह वार्तापत्र संपादक - संजय भिंताडे.