rat७p७.jpg
२५N३६९२५
ः मंजिरी कांबळे
‘आविष्कार संशोधन’मध्ये मंजिरी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः जुहू येथे झालेल्या आंतरक्षेत्रीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या बीसीए कॉलेजच्या मंजिरी कांबळे या विद्यार्थिनीने प्युअर सायन्स या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून एसएनडीटी विद्यापिठात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे.
आविष्कारची संकल्पना २००६ मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि विद्यापिठाचे कुलपती एस. एम. कृष्णा यांनी मांडलेली होती. आता ही स्पर्धा महाराष्ट्रातील विद्यापिठांमध्ये चांगली रूजली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संशोधन वृत्ती विकसित व्हावी याकरिता घेण्यात येणाऱ्या आविष्कार या स्पर्धेमध्ये महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातर्फे एकूण चार प्रकल्प सादर करण्यात आले होते. प्रथम फेरी ही एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स पुणे येथे २१ डिसेंबर २०२४ ला घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये मंजिरी कांबळे हिने प्रथम क्रमांक मिळवून पुणे झोनमधून पुढील फेरीसाठी तिची निवड झाली होती. यामध्ये कांबळे या विद्यार्थिनीने ‘महिलांची सुरक्षा’ हा प्रकल्प सादर केला. १२ ते १५ जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापिठामध्ये होणाऱ्या आंतरविद्यापीठ फेरीसाठी कांबळे ही एसएनडीटी विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या प्रकल्पासाठी प्राध्यापिका प्रतिभा लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.