New Delhi : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
राजीव कुमार यांनी आज दिल्लीतील चे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत सर्व 70 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात दिल्लीत कुणाची सत्ता येणार, आप पुन्हा सत्ता काबीज करणार का, याची उत्तरे मिळणार आहेत.
दरम्यान, त प्रामुख्याने सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. आपने सर्वच जागांवरील उमेदवारांची घोषणा करून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसनेही जवळपास 50 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून काही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
आयोगाकडून ताकीदनिवडणूक आयोगाने प्रचारादरम्यान स्टार प्रचारकांनी मर्यादेत राहून बोलावे, असे आवाहन केले आहे. महिलांविषयी बोलताना काळजी घ्यावी. निवडणुकीत प्रचारादरम्यान लहान मुलांचा वापर टाळावा, असे आवाहन राजीव कुमार यांनी केले आहे.
ईव्हीएम हॅक होऊच शकत नाहीराजीव कुमार यांनी यावेळी ईव्हीएमवर भाष्य केले. ईव्हीएमवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणुक आयोग पारदर्शकपणे निवडणूक पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.