पिंपरी, ता. ७ ः ‘‘नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या बांधवांनी संघटनेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे. स्पर्धेच्या युगात लग्न जुळविणे पालकांना कठीण होत आहे. त्यामुळे परिचय मेळाव्यातून योग्य वधु-वरांचा शोध घेणे शक्य होत असून, अशा प्रकारचे स्नेहमेळावा घेणे काळाची गरज आहे,’’ असे मत कृष्णालाल सहारे यांनी केले.
खेडुले कुणबी समाज सेवा संस्था पुणे यांच्यातर्फे आळंदीमध्ये आयोजित स्नेहमेळाव्यात सहारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयप्रकाश दाणी होते. शुकलाल रावते म्हणाले, ‘‘पुण्यात येणारा समाजबांधव मोठ्या प्रमाणात असल्याने स्नेह व वधु-वर मेळावा आपल्या समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.’’ समाजाच्या विशेषांकाचे प्रकाशन केले. गुणवंत विद्यार्थी व सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार केला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, मुंबईसह मध्यप्रदेशातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुण ठाकरे, आलोक देसाई, श्रावण प्रधान, नाईकराव दंडारे, उमाकांत खरकाटे, प्रमोद मिसाळ, महेश ढोंगे, सचिन सहारे, ज्योती ठाकरे, मनीषा दाणी, लोकेश पिल्लारे, राजेश ढोरे, नानाजी दोनाडकर, अरविंद दोनाडकर, लोकमन राऊत, नीलेश कुथे, जितेंद्र झुरे, किशन तलमले, सुरेश राऊत, सुधाकर भर्रे, मुरलीधर भर्रे, दयाराम सहारे, मनोहर कुथे, संजय बुल्ले, अशोक कामडी, अजय अवसरे, राजेंद्र सौंदरकर आदी उपस्थित होते. रोशन सहारे यांनी सूत्रसंचालन केले.