Shahu Chhatrapati: खासदार शाहू महाराजांबद्दलच्या 'या' इटरेस्टिंग गोष्टी तुम्हांला माहितीय का..?
Sarkarnama January 08, 2025 04:45 AM
Shahu Chhatrapati छत्रपती शाहू

कोल्हापुर घराण्याचे वारसदार असलेले छत्रपती शाहू महाराज यांचा 7 जानेवारीला वाढदिवस असतो. त्यांचा मंगळवारी 75 वा वाढदिवस आहे.

Shahu Chhatrapati शिक्षण

छत्रपती शाहू महाराजाचा जन्म मुंबईत झाला असून त्यांनी त्यांचं शिक्षण नागपूर आणि बंगळूर येथील बिशप कॉटन या हायस्कूलंमधून पूर्ण केले. खिश्चन कॉलेजमधून अर्थशात्र, इतिहास त्याचबरोबर इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं.

Shahu Chhatrapati करवीर संस्थान

शाहू महाराजांचा करवीर या संस्थानचे समाजकार्याचा वारसा पुढे नेण्याचं मोलाचं काम केले.

Shahu Chhatrapati भोसले घराण्यातून त्यांना दत्तक

कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते चिरंजीव आहेत. नागपूरच्या भोसले घराण्यातून त्यांना दत्तक घेण्यात आले.

Shahu Chhatrapati पुस्तकांच ग्रंथालय

शाहूंना वाचनाची प्रचंड आवड असल्यानं त्यांच्या कोल्हापुरच्या वाड्यात भव्य पुस्तकांचं ग्रंथालय आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत.

Shahu Chhatrapati विकासकामांत मोलाचा वाटा

शाहूंनी शहरातील अनेक विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. शासकीय कार्यालय, मैदान, स्टेडियम उभे करण्यासाठी जागा खुली करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Shahu Chhatrapati लोकसभा निवडणुकीत विजय तुरा...

2024 च्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांनी दीड लाख मताधिक्यांनी पराभव केला. छत्रपती घराण्याला कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करण्याचा हा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे.

NEXT : HMPV चा धोका कसा टाळणार? घाबरू नका, अशी घ्या खबरदारी!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.