सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसचा अठरावा सिझन लवकरच संपणार आहे. या सिझनच्या ग्रॅंड फिनालेची तारीख जाहीर झाली आहे. सलमान खानने स्वत: तारीख जाहीर केली आहे. बिग बॉसमधील 'वीकेंड का वार' या एपिसोडमध्ये सलमानने फायनलची तारीख जाहीर केली आहे. सध्या बिग बॉसच्या घरात 9 स्पर्धक आहेत. त्यामुळे काही दिवसात बिग बॉसच्या अठराव्या सिझनचा विजेता प्रेक्षकांना भेटणार आहे.
बिग बॉसच्या आठराव्या सिझनमध्ये प्रत्येक स्पर्धक विजेतेपदासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ईशा सिंग, चाहत पांडे, विवियन डिसेना , चुम दारांग यासारखे कलाकरामध्ये जेतेपद जिंगण्यासाठी चुरस रंगली आहे. परंतु पहिल्या दिवशीपासून करणवीर याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
कधी होणार बीग बॉस 18 चा फिनाले?येत्या 19 जानेवारीला बिग बॉस 18 चा विजेता भेटणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या शोचा शेवट जवळ आल्याने उरलेले स्पर्धक विजेतेपद मिळवण्यासाठी जिवाची बाजी लावत आहे. प्रत्येक स्पर्धेत छान खेळी करत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
चा ग्रॅंड फिनाले 19 तारखेला होणार असला तरी या शोची वेळ जाहीर झाली आहे. मात्र प्रत्येक सिझननुसार यावेळीही रात्री 9 वाजता फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षक फिनालेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
च्या विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तसंच त्या सोबत बिग बॉसची ट्रॉफी देखील दिली जाणार आहे. सूत्रसंचालक सलमान खान दोन स्पर्धकांना मंचावर बोलावून विजेता घोषित करणार आहे.