Maharashtra Weather temperature in state will increase, possibility of decrease in the temperature of Mumbai PPK
Marathi January 08, 2025 11:24 AM


राज्याच्या विविध भागात तपमानाच्या पाऱ्यात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तपमानात बदल होत आहेत. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या आणि मुंबईच्या तपमानात घसरण होणार आहे.

मुंबई : राज्याच्या विविध भागात तपमानाच्या पाऱ्यात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तपमानात बदल होत आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश भागात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तपमान घसरणार असून 3 ते 5 अंशांनी राज्यात किमान तपमानात घट होणार आहे. परंतु, सोमवारी (ता. 06 जानेवारी) राज्यातील विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तपमानाच्या तुलनेत अधिक तपमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, येत्या 24 तासांमध्ये तपमानाच्या पाऱ्यात घसरण होणार असून मुंबईतही थंडीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Weather temperature in state will increase, possibility of decrease in the temperature of Mumbai)

उत्तर भारतात तपमानाच्या पाऱ्यात घसरण होत असल्याने हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने हिमवृष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काश्मीरात अद्यापही अनेक भागांवर बर्फाची पांढरी चादर ओढलेलीच पाहायला मिळत आहे. तर, उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. 07 जानेवारी) आणि बुधवारी (ता. 08 जानेवारी) मुंबईचे किमान तपमान 14 अंश नोंदवण्यात येईल तर राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Rani Baug Byculla : बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी राणी बागेमधील प्राण्यांचे चिकन बंद

मुंबईसोबत कोकणातील अनेक भागांमध्येही किमान तपमानाच्या पाऱ्यात घसरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तपमानाचा पारा 16 अंशांच्या आसपास नोंदविला जात आहे. सोमवारीसुद्धा मुंबईचे किमान तपमान 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

– Advertisement –

राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने केली आहे. राज्यात सोमवारी कमाल व किमान तपमान सामान्य तपमानाच्या तुलनेत अधिक होते. सोलापुरात 37 अंश सेल्सियस तपमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तपमानाची ही नोंद होती. हिवाळा सुरू असला तरी राज्यातील बहुतांश भागात तपमानात लक्षणीय वाढ झाल्याची नोंद करण्यात येत आहे. पण दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री गारवा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे पाहायलाल मिळत आहे. सोमवारी सर्वात कमी तपमानाची नोंद ही जळगावात करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात सोमवारी 11 अंश तपमानाची नोंद झाली. ही नोंद किमान तपमानाच्या तुलनेत खूप अधिक होती.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.