Ranbir Kapoor- Alia Bhatt : रणबीर कपूर आलिया भट्टच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका मर्सिडीजचा समावेश; ही आहेत वैशिष्ट्ये
Saam TV January 09, 2025 04:45 AM

Ranbir Kapoor- Alia Bhatt : बॉलिवूडचे पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये नवीन कारचा समावेश केला आहे. या बी-टाऊन कपलने अलीकडेच Lexus LM350 खरेदी केले आहे. जपानी वाहन उत्पादक कंपनीच्या या लक्झरी MPV मध्ये कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत? ते कोणत्या किंमतीला खरेदी केले जाऊ शकते? या बातमीत आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी Lexus LM350 केली खरेदी

आणि यांनी नववर्षानिमित्त सुट्टी साजरा करुन आल्यानंतर त्यांनी अलीकडेच त्यांच्या गॅरेजमध्ये Lexus LM350 या गाडीचा समावेश केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून ही माहिती मिळाली आहे.

वैशिष्ट्ये कशी आहेत?

Lexus ने LM350 मध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. काळ्या किंवा पांढऱ्या पर्यायाने जागा निवडता येतील. यासोबतच यात 14-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो समोर आहे. मागील बाजूस, 23 स्पीकर्ससह 48-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि ऑडिओ सिस्टम प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय फोल्डेबल टेबल, व्हॅनिटी मिरर, छोटा फ्रीजही यामध्ये देण्यात आला आहे.

दमदार इंजिन

Lexus LM 350 मध्ये 2.5 लीटर चार-सिलेंडर पेट्रोल हायब्रिड इंजिन आहे. यामुळे MPV ला 192 हॉर्स पॉवर तसेच 240 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यासोबतच कारमध्ये CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे . LM350 ची सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमत 2 कोटी रुपयांपासून होते. तर त्याचे इतर प्रकार 2.5 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीने काही काळापूर्वी ही SUV भारतीय बाजारात लॉन्च केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.