राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामुळे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे.
राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि पदवी चर्चा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी सीईटी वेळापत्रकानुसार होईल. टीसीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल रोजी होणार आहे.
तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाची सिईटी परीक्षा २० ते २१ मार्च रोजी तर ५ वर्षे विधीची सीईटी परीक्षा २८ एप्रिल रोजी होणार आहे. एमसीएची सीईटी परीक्षा २३ मार्चला होणार आहे. तर एमबीएची सीईटी परीक्षा १ ते ३ एप्रिल दरम्यान होणार आहे.
तर, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाची सिईटी परीक्षा ३० एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आपल्या परीक्षाच्या तारखा पाहून विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन केले जात आहे.