या लोकांसाठी ओला मटार म्हणजे विषासमान; चुकूनही खाऊ नका अन्यथा…
GH News January 08, 2025 05:13 PM

हिवाळ्यात भरपूर भाज्या बाजारात असतात. त्यात हिरवे मटार ही भाजी अनेकांची आवडती असते. त्यामुळे ओले मटार बाजारातून घरी आवर्जून आणले जातात. मुळात म्हणजे ते कच्च्या स्वरूपातही आपण खाऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच जणांचे हिरवे मटार ही आवडीची भाजी असते.

वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, जस्त, लोह, मँगनीज, तांबे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. पण हा वाटाणा काही लोकांसाठी अपायकारक आहे. काही लोकांनी हिरवा वाटाणा खाणे टाळणे योग्य राहिलं. असं का ते पाहुयात.

हिरवे वाटाणे खाण्याचे दुष्परिणाम

हिरवे वाटाणे हा पोषक तत्वांचा खजिना जरी असला तरी त्याचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. एवढेच नाही तर काही लोकांसाठी तर ते विषसामान आहेत. ज्यांच्या शरीरात हिरवा वाटाणा विषासारखे काम करतो. यासोबतच जाणून घ्या जास्त वाटाणा

या लोकांनी चुकूनही खाऊ नये हिरवे वाटाणे

मटारमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई, जस्त, लोह, मँगनीज, तांबे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. ज्या लोकांना मधुमेह, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्या आणि गॅसची समस्या आहे त्यांनी मटार खाऊ नये.

किडनी स्टोन ज्यांना किडनीची समस्या आहे त्यांनी हिरवे वाटाणे खाताना काळजी घ्यावी. मटारमध्ये प्युरिन असतात, जे यूरिक ऍसिडमध्ये मोडतात आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याची समस्या अधिक वाढते.

पोटफुगी फायटिक आणि लेक्टिन हिरव्या मटारमध्ये आढळतात, ज्यामुळे पोट फुगल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त वाटाणे खाल्ल्याने पोटदुखी आणि सूज देखील होते. ज्यांना कच्चे वाटाणे खायला आवडतात त्यांनी हे लक्षात ठेवावे.

मधुमेह मटारमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते, ज्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला जार मधुमेह असेल ते मर्यादित प्रमाणातच खावे.

पोषक तत्वांची कमतरता जास्त वाटाणे खाल्ल्याने काही वेळा शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यात असलेले लेक्टिन आणि फायटिक ॲसिड पोषक तत्वांचे शोषण कठीण करतात.

(डिस्क्लेमर:  वरील माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून घेतलेली आहे.  त्यामुळे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या) 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.