एक्सपायर फेसवॉश चेहऱ्यावर लावल्याने, त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण बऱ्याचदा एक्सपायर झालेला फेसवॉश आपण फेकून देतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? एक्सपायर फेसवॉश घरातील काही कामांसाठी खूप उपयोगी आहे. या एक्सपायर फेसवॉशमुळे आपले काम देखील सोपे आणि लवकर होईल. आज आपण जाणून घेऊयात, एक्सपायर फेसवॉशने घरातील कोणते काम सोपे होईल.
घरातील मॅट्स आणि कार्पेट खूप लवकर खराब होता. अशावेळी तुम्ही एक्सपायर फेसवॉशने घरातील मॅट्स आणि कार्पेट स्वच्छ करू शकता. यासाठी सर्व प्रथम कार्पेट किंवा मॅटस पाण्याने पूर्णपणे धुवून घ्या. आता त्यावर फेसवॉश घालून ब्रशच्या साहाय्याने मॅट किंवा कार्पेट स्क्रब करा.
एक्सपायर झालेल्या फेसवॉशने तुम्ही टाइल्स देखील स्वच्छ करू शकता. यासाठी एक चमचा फेसवॉशमध्ये मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करून घ्या. क्लिनर म्हणून याचा वापर करा. त्यानंतर, स्क्रबरने नीट घासून टाइल्स स्वच्छ करून घ्या.
तुम्ही लिक्विड डिटर्जंट किंवा शॅम्पूने कार, स्कूटर आणि सायकल स्वच्छ केली असेल. परंतु, तुम्ही कधी फेस वॉशचा वापर केला आहे का ? जर तुमच्याकडे शॅम्पू किंवा डिटर्जंट नसेल तर तुम्ही फेसवॉशने देखील कार साफ करू शकता. किंवा शॅम्पू आणि डिटर्जंटमध्ये फेस वॉश मिक्स करून ब्रशच्या किंवा कपड्याच्या साहाय्याने कार वॉश करू शकता.
तुम्ही लादी पुसण्यासाठी देखील एक्सपायर फेसवॉश वापरू शकता. पाण्यात फेसवॉशचे काही थेंब घालून मिक्स करून मॉप किंवा कपड्याच्या साहाय्याने लादी स्वच्छ करू शकता.
एक्सपायर फेसवॉशचा उपयोग घरातली साफसफाई करण्यासाठी देखील केला जातो. घरातील काही गोष्टी तुम्ही या फेसवॉशने स्वच्छ करू शकता.
अशा प्रकारे एक्सपायर फेसवॉशने तुमचे घर सहजपणे स्वच्छ होईल आणि या फेसवॉशमुळे तुमचे काम देखील सोपे होईल.
हेही वाचा : Kitchen Tips : हिवाळ्यात फ्रीजचा वापर करावा सांभाळून, अन्यथा..
संपादन : प्राची मांजरेकर