'विघ्नहर'च्या निवडणुकीचा बिगूल वाजला
esakal January 09, 2025 02:45 AM

जुन्नर, ता. ८ : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. साखर कारखान्याच्या २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदार यादी बुधवारी (ता. ८) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
श्री विघ्नहर साखर कारखान्याचे जुन्नर व आंबेगाव हे दोन तालुके कार्यक्षेत्र आहेत. दोन्ही तालुक्यातील पाच मतदारसंघांतील २०९ गावांतील २२ हजार ३२५ सभासदांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

३१ जानेवारीला अंतिम मतदार यादी
मतदार यादी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व तहसीलदार कार्यालय, जुन्नर यांच्या सूचना फलकावर पाहण्यासाठी व तपासणीसाठी उपलब्ध आहेत. यादीवरील आक्षेप, हरकती प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयात १७ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहेत. यावर २७ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी ३१ जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

मतदारसंघ : गावे : मतदारसंख्या
जुन्नर : ६० : ३३६१
शिरोली बुद्रूक : २० : ५०९६
ओतूर : ३९ : ४००८
पिंपळवंडी : २९ : ७४२९
घोडेगाव : ६१ : २४३१

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.