Icc Champions Trophy 2025 स्पर्धेतून रोहितचा खास भिडू कमबॅकसाठी सज्ज, कोण आहे तो?
GH News January 09, 2025 03:08 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 9 मार्चला अंतिम सामना पार पडणार आहे. खबरदारी म्हणून 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. इंग्लंडने सर्वातआधी या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जॉस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर इतर 7 संघांनी अजून खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाही. सर्व संघांना खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी ही शेवटची मुदत आहे.

रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश केला जाईल. तसेच रोहितचा खास भिडू टीम इंडियात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. या खेळाडूने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमधील 5 स्पर्धांमध्ये 1 हजार 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच हा खेळाडू टीममधून 5 महिने दूर आहे. त्यामुळे निवड समिती या मुंबईकर खेळाडूला संधी देते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

श्रेयस अय्यर

आपण बोलतोय ते टीम इंडियाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत. श्रेयस अय्यर याला गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. श्रेयसला वार्षिक करारातून वगळण्यात आलं. तसेच त्याला टीमपासूनही दूर रहावं लागलं. श्रेयसने अखेरचा कसोटी सामना हा फेब्रुवारी 2024 साली खेळला. तर श्रेयसने अखेरचा एकदिवसीय सामना ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. मात्र श्रेयसच्या कामगिरीवर त्याचा काहीही फरक पडला नाही. श्रेयसने उलटपक्षी याचा फायदा घेत देशांतर्गत क्रिकेटमधील विविध स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत कमबॅकचा दावा ठोकला आहे.

श्रेयस कर्णधार रोहित शर्माचा विश्वासातला भिडू आहे. दोघेही मुंबईचेच आहेत. त्यामुळे रोहितला श्रेयसच्या खेळाबाबत सर्व काही माहित आहे. श्रेयस टॉप ऑर्डरमधील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. श्रेयसने चौथ्या स्थानी आतापर्यंत आपली छाप सोडली आहे.

श्रेयसची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

दरम्यान श्रेयसने गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. श्रेयसने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीत 90 च्या सरासरीने 452 धावा केल्या. श्रेयसने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 49 च्या एव्हरेजने 345 रन्स केल्या. श्रेयसला विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत कुणी बॉलर आऊट करु शकला नाही. श्रेयसने 5 सामन्यांमध्ये 2 शतकांसह 325 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.