टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दोघांचे नाते घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान बुधवारी धनश्रीचा एका तरुणासोबतचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्यावरून लोकं वेगवेगळ्या शक्यता वर्तवत आहेत. घटस्फोटाबाबत अद्याप ना चहल ना धनश्री दोघंही बोललेली नाहीत.
मात्र बुधवारी एका तरुणासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर धनश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधून ती व्यक्त झाली आहे. ”गेले काही दिवस मला व माझ्या कुटुंबाला खूप कठीण गेले. ट्रोलर्सकडून माझ्या चारित्र्यावर उठणारे प्रश्न, कोणतीही शहानिशा न करता लिहलेलं लिखाणं हे खूपच त्रासदायक आहे. मी गेली अनेक वर्ष माझं नाव व करिअर बनविण्यासाठी मेहनत केली आहे. माझं मौन हे काही माझ्या कमजोरीचं चिन्ह नाही. पण ते माझी ताकद आहे. नकारात्मकता ऑनलाईन माध्यमांमधून सहज पसरवली जाते. मात्र इतरांना वर आणण्यासाठी धैर्य लागते. मी माझ्या तत्वांनुसार माझ्या खरेपणावर, सत्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. सत्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते, अशी पोस्ट धनश्रीने शेअर केली आहे.