नवी मुंबईमध्ये हक्काचे घर असावे असं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सीडकोमार्फत त्यांना स्वस्तामध्ये घर घेता येणार आहे. कारण सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेच्या तब्बल २६००० घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. सिडकोंच्या घराच्या किंमती २५ लाखांपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अगदी कमी किमतीमध्ये आणि खिशाला परवडेल असं घर घेणं सोपं होणार आहे.
सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेअंतर्गत २६००० घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीमध्ये ३ वेळा मुदत वाढ दिली. आतापर्यंत हजारो नागरिकांनी या सिडकोच्या या घरांसाठी अर्ज केला आहे. १० जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अजूनही अर्ज करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. अशामध्ये सिडकोने घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेंतर्गत २६००० घरं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी देण्यात येणार आहे. या योजनेतील ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये असणार आहेत. या सिडकोच्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या योजनेअंतर्गत EWS म्हणजेच ज्यांचे उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे अशा आर्थिक दुर्बल घटक गटासाठी २५ ते ४८ लाखांपर्यंत घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त आहे अशा अत्यल्प (LIG) गटासाठी घरांच्या किमती ३४ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत असणार आहे.
आर्थिक दुर्बल घटक EWS -तळोजा सेक्टर - २८ ते २५.१ लाख
तळोजा सेक्टर - ३९ ते २६.१ लाख
खारघर बस डेपो - ४८.३ लाख
बामणडोंगरी - ३१.९ लाख
खारकोपर 2A, 2B - ३८.६ लाख
कळंबोली बस डेपो - ४१.९ लाख
अल्प उत्पन्न गट (LIG) -- पनवेल बस टर्मिनस - ४५.१ लाख
- खारघर बस टर्मिनस- ४८.३ लाख
- तळोजा सेक्टर 37 - ३४.२ लाख ४६.४ लाख
- मानसरोवर रेल्वे स्टेशन - ४१.९ लाख
- खांदेश्वर रेल्वे स्टेशन - ४६.७ लाख
- खारकोपर ईस्ट - ४०.३ लाख
- वाशी ट्रक टर्मिनल - ७४.१ लाख
- खारघर स्टेशन सेक्टर वन A- ९७.२ लाख