सिंहगड रस्ता, ता. 8 : मुख्य सिंहगड रस्त्याला भा. द. खेर आनंदनगर चौकात झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. विठ्ठलवाडी कडून माणिकबागच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी आणि पिकअप ( ट्रक) यांच्यात मोठी धडक बसली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला डोक्याला दुखापत झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलगोबीच्या शेतात फिरवला रोटावेटरफुलगोबीला दर मिळत नसल्यानं खर्चही निघत नाहीय. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने २ एकर शेतीवर रोटावेटर फिरवला. फुलगोबीला एक ते दोन रुपये किलो असा भाव मिळत असल्यानं शेतकरी संतप्त झाला आहे.
Kolhapur News : भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच टाकले विषारी औषधकोल्हापूर : भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच टाकले विषारी औषध
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील घटना
आपल्या मर्जी विरोधात भाचीने आठवड्यापूर्वी गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाचे कृत्य
महेश जोतीराम पाटील असं मामाचे नाव
पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर पोलिसांकडून शोध सुरू
Anand Nagar Accident LIVE : आनंदनगर चौकात भीषण अपघात, महिला गंभीर जखमीआनंद नगर चौकात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.
One Nation, One Election LIVE : 'वन नेशन, वन इलेक्शन' संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज होणारदिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन' या संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या समितीला कायदा आणि न्याय मंत्रालयाचे अधिकारी माहिती देतील. जेपीसीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी ही बैठक बोलावली आहे.
कोल्हापूर : एकीकडे चित्रनगरीत चित्रीकरण वाढले आहे. येथील तरुणाई सिनेक्षेत्रात अनेक नव्या संकल्पना यशस्वी करतानाच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंधरा जानेवारीला होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीकडे सभासदांचे लक्ष आहे.
Weather Update LIVE : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थितीउत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे.
Vishalgad Tourism LIVE : विशाळगड पर्यटक, भाविकांसाठी खुलाLatest Marathi Live Updates 8 January 2025 : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील ७० जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होईल, तर आठ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तसेच विशाळगड आणि मुसलमानवाडी येथे झालेल्या तोडफोडीनंतर तेथे तब्बल सहा महिने संचारबंदी लागू होती. मात्र, कालपासून ही संचारबंदी शिथिल करण्यात आलीये. राज्यातील सर्व चारचाकी वाहनधारकांना येत्या १ एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. तिबेटमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान भूकंपाचा ६.८ रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का बसला. या शक्तिशाली भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून १८८ जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून कडाक्याची थंडी आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..