Maharashtra News Live Updates: पुण्यातील सिंहगडरोडवर भीषण अपघात, महिला गंभीर जखमी
Saam TV January 09, 2025 03:45 AM
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये फुलगोबीच्या 2 एकर शेतीवर फिरवला रोटाव्हेटर

छ्त्रपती संभाजीनगरमध्ये फुलगोबीच्या 2 एकर शेतीवर फिरवला रोटाव्हेटर

फूलगोबीला बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने फिरवला 2 एकर वर रोटाव्हेटर

कन्नड तालुक्यातील शेवता येथील नवनाथ पवार या शेतकऱ्याने 2 एकर शेतीवर केलेला खर्च निघत नसल्यामुळे फिरवला रोटाव्हेटर

50 ते 60 हजार रुपयांचा खर्च आणि गोबीला भाव कवडीमोल 1, 2 रुपया किलो भाव

शेतातून काढून बाजारात नेण्याचाही खर्च निकत नसल्यामुळे शेतकरी संतप्त

संतप्त शेतकऱ्याने गोबीवर रोटाव्हेटर चालवण्याचा घेतला निर्णय

गोबीला शून्य बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

Pune News: पुण्यातील सिंहगडरोडवर भीषण अपघात, महिला गंभीर जखमी

- सिंहगडरोडवर भीषण अपघात महिला गंभीर जखमी

- सिंहगड रस्त्याबर आनंदनगर चौकात झालेल्या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी

- विठ्ठलवाडीकडून माणिकबागच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक

- या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली

- महिलेला डोक्याला दुखापत झाली आहे

- उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

- सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत

Maharashtra Politics: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

विधानसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफीचा दिलेला आश्वासन पूर्ण करण्याची मागणीचे दिले पत्र

सरकार येऊन महिना लोटला तरीही कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं पत्रातून केला उल्लेख

Nagpur News: अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर

- कुख्यात मुंबई डॉन अरुण गवळीला 28 दिवसाची संचित रजा मंजूर,

- नागपूर खंडपीठाने केली संचित रजा याचिकेवर निर्णय देत मंजुरी,

- अरुण गवळी यांनी संचित राजा मिळवण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षकडे 18 ऑगस्ट 2024 केला होता अर्ज

- मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 2024 ला तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता.

- या विरोधात अरुण गवळी याने वकिलामार्फत याचिका मंजूर केली होती.

- त्याच याचिकेवर 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली

Nagpur News: महाविकास आघाडीच्या २० पेक्षा जास्त पराभूत उनेदवारांची कोर्टात धाव

नागपूर

- आतापर्यंत महाविकास आघाडीच्या २० पेक्षा जास्त पराभूत उनेदवारांच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल

- यशोमती ठाकूर, प्रफुल गुडधे, गिरीश पांडव, वसंत पुरके, रमेश बंग, महेश गणगणे, सलील देशमुख, जयश्री शेळके यांसह

- EVM बाबत अनेक नियम आणि निकषांची पायामल्ली करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या अनेक निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल

- निवडणुकीचा निकाल लागल्यावर ४५ दिवसांत निवडणूक याचिका दाखल करता येतात

- काल ४५ वा दिवस असल्याने काही जणांनी याचिका दाखल केल्या. वसंत पुरके, राहुल बोंद्रे आणि स्वाती वाकेकर यांचा यात समावेश आहे...

Nashik News: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

- नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

- महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड, पंचवटी, नियोजित साधुग्राम परिसराला भेट देवून केली पाहणी

- कुंभमेळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासह स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीसाठी दिल्या सूचना

- तर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासह सुशोभीकरणासाठी पालिकेची आपली गोदावरी स्पर्धा

- आपली गोदावरी स्पर्धेच्या माध्यमातून नाशिककरांच्या मागवल्या सूचना

- गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या गोदावरीला कुंभमेळ्यापूर्वी प्रदूषण मुक्त करण्याचा पालिका आयुक्तांचा संकल्प

- आगामी २०२६-२७ मध्ये पार पडणार नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा

Jalgaon News: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज जळगाव दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या 33 व्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार आहे

Pune News: सीईटीच्या सुधारित तारखा जाहीर, 9 एप्रिल ते 19 एप्रिल रोजी होणार परीक्षा

सीईटीच्या सुधारित तारखा जाहीर

सीईटीच्या परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले

अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी सीईटी वेळापत्रकानुसार होईल

टीसीइटी 9 एप्रिल ते 19 एप्रिल रोजी होणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.