सिडकोत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 26000 घरांच्या किमती जाहीर
Marathi January 09, 2025 05:24 AM


नवी मुंबई : ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील एकूण 26 हजार घरांच्या किमती महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) जाहीर केल्या आहेत. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत 26000 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्वाधिक ग्राहकांना घर घेता यावी, यासाठी तीन वेळी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली. त्यानुसार, या योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 पर्यंत आली आहे. (cidco homes lottery declared price range for 26000 houses)

सिडकोकडून घरांच्या किंमती जाहीर

सिडकोने ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील 26000 घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटक या गटातील घरांसाठी 25 ते 48 लाखांपर्यंत किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच, अत्यल्प म्हणजे LIG गटातील घरांसाठी 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.

– Advertisement –

गट EWS (आर्थिक दुर्बल घटक)

  • तळोजा सेक्टर 28 – 25.1 लाख
  • तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
  • खारघर बस डेपो – 48. 3 लाख
  • बामणडोंगरी -31. 9 लाख
  • खारकोपर 2A, 2B -38.6 लाख
  • कळंबोली बस डेपो – 41.9 लाख

अल्प उत्पन्न गट एलआयजी

  • पनवेल बस टर्मिनस – 45.1 लाख
  • खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
  • तळोजा सेक्टर 37 – 34.2 लाख 46.4 लाख
  • मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
  • खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट – 40.3 लाख
  • वाशी ट्रक टर्मिनल – 74.1 लाख
  • खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख

ऑनलाईन नोंदणी

सिडकोनं ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 आहे. मात्र, आता गुलदस्त्यात असलेल्या घरांच्या किमत सिडकोने जाहीर केल्यानंतर दोन दिवसात किती अर्ज दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – Torres Scam : कल्याणमधील महिलेला पश्चाताप; पतीनं मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे टोरेसमध्ये गुंतवले



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.