नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं कोट्यवधी खातेधारकांना एक सूचना वजा इशारा दिला आहे. सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी इशारा देण्यात आला आहे. ईपीएफओनं खातेदार असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करु नये, असा सल्ला दिला आहे. ईपीएफओनं त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन हे माहिती दिली आहे.
ईपीएफओनं अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन काही बाबी स्पष्ट केल्या. यामध्ये ईपीएफओकडून सांगण्यात आलं की खातेदारांची कोणतीही माहिती मागितली जात नाही. कोणताही व्यक्ती ईपीएफओचा कर्मचारी अथवा अधिकारी असल्याचं सांगत फोन नंबर, ईमेल, मेसेज किंवा व्हाटसअपद्वारे यूएएन, पासवर्ड,पॅन नंबर, आधार क्रमांक, बँक खाते किंवा ओटीपी मागत असेल तर ती माहिती देऊ नका, असं सांगण्यात आलं आहे.
सायबर गुन्हेगार स्वत:ला ईपीएफओचे अधिकारी असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करु शकतात. हे गुन्हेगार गोपनीय माहितीचा दुरुपयोग देखील करु शकतात. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पीएफ खात्यातील रक्कम देखील काढू शकतात, त्यामुळं खातेदारांनी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जर कोणताही व्यक्ती ईपीएफओच्या नावानं तुमच्याकडून गोपनीय माहिती मागत असेल सतर्क होत तक्रार दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सायबर कॅफे किंवा सार्वजनिक डिव्हाईसवर तुम्ही ईपीएफओ खात्यात लॉगीन करु नये, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
ईपीएफओनं खातेदारांना वैयक्तिक लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा मोबाइल फोनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळं तुमची माहिती सुरक्षित राहू शकते. फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी होते.
ईपीएफओनं त्यांची वेबसाईट अपडेट देखील केली आहे. सोशल मीडियाद्वारे खातेदारांना देखील जागरुक केलं जात आहे. सायबर गुन्हेगारांपासून खातेदारांची फसवणूक होऊ नये, यासासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनं ईपीएफओ करण्यात आलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या आहेत. खातेधारकांनी त्यांच्या खात्यांची गोपनीयता काम राखणं आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीसोबत किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत तुमच्या खात्याचे महत्त्वाचे तपशील शेअर करणं टाळल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.
इतर बातम्या :