Delta Autocorp IPO चा ग्रे मार्केटमध्ये बोलबाला; जीएमपी पोहचला 130 रुपयांवर, तुम्ही सबस्क्राइब केला का?
मुंबई : नवीन वर्ष सुरू होताच अनेक आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होत आहेत. असाच एक आयपीओ म्हणजे डेल्टा ऑटोकॉर्प होय. कंपनीच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आयपीओ पहिल्या दोन दिवसांत ५७ पेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब झाला आहे. डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडच्या आयपीओवर अजूनही बोली लावण्याची संधी आहे. कंपनीचा आयपीओ गुरुवार, ९ जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला आहे. डेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडच्या आय़पीओचा एकूण आकार ५४.६० कोटी रुपयांपर्यंत आहे. कंपनीचा आयपीओ ७ जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला होता. डेल्टा ऑटोकॉर्पचा जीएमपीडेल्टा ऑटोकॉर्पच्या आयपीओमधील शेअरची किंमत १३० रुपये आहे. तसेच, कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सध्या ११६ रुपयांवर चालू आहे. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार, डेल्टा ऑटोकॉर्पचे शेअर्स बाजारात जवळपास २४६ रुपयांना सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील त्यांना लिस्टिंगच्या दिवशी ८९ टक्क्यांहून अधिक नफा मिळण्याची अपेक्षा असू शकते. डेल्टा ऑटोकॉर्पचे शेअर्स मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी बाजारात सूचीबद्ध होतील.
कंपनीचा आयपीओ ५७ पट सबस्क्राइबडेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडच्या आयपीओवर पहिल्या २ दिवसांत एकूण ५७.८३ पट बोली लावण्यात आली आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांचा भाग ९७.१३ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (NII)भाग ३९.५७ पट, पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा (QIB) भाग २.७१ पट सबस्क्राइब झाला. डेल्टा ऑटोकॉर्पच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार फक्त १ लॉटवर बोली लावू शकतात. एका आयपीओ लॉटमध्ये १००० शेअर्स असतात. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,३०,००० रुपये गुंतवावे लागतील. कंपनीचा व्यवसायडेल्टा ऑटोकॉर्प लिमिटेडची सुरुवात २०१६ मध्ये झाली. ही कंपनी दुचाकी आणि तीन चाकी ईव्हीचे उत्पादन आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. डेल्टा ऑटोकॉर्प डेल्टिक ब्रँड नावाखाली काम करते. कंपनी ३०० हून अधिक डीलर्सच्या नेटवर्कद्वारे काम करते. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनीत १३९ कर्मचारी आहेत.