Stock Market Opening Latest Update 9 January 2025: देशांतर्गत शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये 32 अंकांची, निफ्टीमध्ये 25 अंकांची, बँक निफ्टीमध्ये 110 अंकांची घसरण झाली. मात्र त्यानंतर बाजार आणखी घसरायला लागले. मिडकॅप निर्देशांक सपाट दिसत होता.
निफ्टी शेअर्सची स्थितीनिफ्टी शेअर्समध्ये आज कोटक बँक 1.71 टक्के, हिंदाल्को 1.56 टक्के, बजाज ऑटो 1.09 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.54 टक्के आणि टीसीएस 0.37 टक्क्यांनी वाढले. त्याच वेळी, लार्सन अँड टुब्रोमध्ये 1.58 टक्के, टाटा मोटर्समध्ये 1.40 टक्के, ट्रेंटमध्ये 1.38 टक्के, अपोलो हॉस्पिटलमध्ये 1.22 टक्के आणि ओएनजीसीमध्ये 1.17 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली.
Stock Market Opening क्षेत्रीय निर्देशांकांची स्थितीक्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी रियल्टीमध्ये 1.20 टक्क्यांनी सर्वात मोठी घसरण दिसून आली. याशिवाय निफ्टी बँक 0.25 टक्के, निफ्टी ऑटो 0.36 टक्के, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस 0.43 टक्के, निफ्टी आयटी 0.17 टक्के, निफ्टी मेटल 0.48 टक्के, निफ्टी फार्मा 0.57 टक्के, निफ्टी पीएसयू बँक 0.19 टक्के, हेल्थकेअर निर्देशांक 0.66 टक्के घसरण झाली.
Stock Market Openingतर कंझ्युमर ड्युरेबलमध्ये 0.90 टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.56 टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये 0.58 टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स-बँकमध्ये 0.53 टक्के घसरण दिसून आली. याशिवाय निफ्टी प्रायव्हेट बँकेत 0.03 टक्के, निफ्टी मीडियामध्ये 1.25 टक्के आणि निफ्टी एफएमसीजीमध्ये 0.06 टक्के वाढ दिसून आली.
आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कलआजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून आला. आज GIFT NIFTY 0.23 टक्क्यांनी वर आहे तर Nikkei 225 1.12 टक्क्यांनी घसरला आहे. स्ट्रेट टाइम्स 0.51 टक्के घसरला आहे तर हँग सेंग सुमारे 0.21 टक्के वाढला आहे. तैवान वेटेड 0.61 टक्क्यांनी घसरला आहे तर कोस्पी सुमारे 0.46 टक्क्यांनी वाढला आहे. तर शांघाय कंपोझिट 0.29 टक्क्यांनी घसरताना दिसत आहे.
BSE SENSEXबुधवारी अमेरिकन किरकोळ बदल दिसून आले. Dow Jones Industrial Average 106.84 अंकांनी, किंवा 0.25% ने वाढून 42,635.20 वर, S&P 500 9.20 अंकांनी, किंवा 0.16% ने वाढून 5,918.23 वर आणि Nasdaq Composite 10,980.80 अंकांनी घसरले.