Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत ट्रेनला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशात १०० पेक्षा जास्त वंदे भारत धावतात, भारतामधील प्रत्येक राज्यात वंदे भारत धावतेय. आता लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. वंदे भारत स्लीपरचे अनेक फोटो समोर आले आहेत. पहिली वंदे भारत स्लीपर दिल्लीला मिळणार असल्याचे समोर आलेय. महाराष्ट्रामध्ये वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने वंदे भारत एक्सप्रेससाठी भारतीय रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केलाय. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यामार्गावर स्लीपर वंदे भारत मिळाली, त्यासाठी नागपूर विभागाने प्रस्ताव पाठवलाय.
मोदी सरकारने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर ट्रेन येणार आहे. साठी बोगी तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांत पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचे फोटो रेल्वेमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
महाराष्ट्राला दोन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळणार ?महाराष्ट्रातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. विभागाने रेल्वे बोर्डाकडे स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी प्रस्ताव मांडलाय. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजतेय. नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई यादरम्यान या दोन ट्रेन धावणार आहेत. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे.. या मार्गावर दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेची संख्याही कमी आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
कोण कोणते थांबा मिळणार ?नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे.
नागपूर, वर्धा,अकोला, शेगाव, जळगाव, मनमाड, नाशिक, कल्याण/ठाणे, दादर, मुंबई याठिकाणी स्लीपर वंदे भारत थांबण्याची शक्यता आहे.
नागपूरमधून सध्या तीन वंदे भारत ट्रेन धावत आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. नागपूर-सिंकदराबाद , नागपूर-इंदूर, नागपूर-बिलासपूर या तीन मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. इंदूर आणि बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद आहे. सिकंदराबाद एक्सप्रेसला हवा त्या प्रमाणात प्रतिसाद नाही.
वंदे भारत एक्सप्रेस ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ट्रेन आहे. पाच ते सात तासांच्या प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आता दीर्घ प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्यात आली आहे. या स्लीपर कोचचे उत्पादन सध्या सुरू आहे, देशभरातील विविध रेल्वे विभागांनी ही ट्रेन सुरू करण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे नागपूर विभागाकडून नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. नवीन गाड्या सुरू करण्याचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाचा असेल.