बड्या उद्योगपतीवर दीपिका पादुकोन भडकली, रविवारीही काम करण्याच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने झाप झा
Marathi January 10, 2025 02:24 AM

मुंबई : खासगी क्षेत्रात कर्मचारी आणि कामगारांची होणारी पिळकवणूक हा विषय नेहमीच चर्चेत येतो. ऑफिसचे काम आणि संसारातील अडचणी यांचा ताळमेळ राखताना कर्मचारी हतबल होताना दिसतात. त्यामुळेच कामाचे तास कमी केले जावेत, असा एक मतप्रवाह दिसतो. मात्र काही उद्योगपती हे कामाचे तास वाढवण्याचे समर्थन करतात. कामाचे तास वाढवण्याच्या मताचे समर्थन करणाऱ्या अशाच एका उद्योजकावर प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोन चांगलीच भडकली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टोरीच्या माध्यमातून या उद्योजकाच्या विचारांचा थेट विरोध केला आहे 

दीपिका पादुकोनने केला विरोध 

लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी बातचित करताना तुम्ही रविवारीही काम केलं पाहिजे, असं विधान केलं होतं. हे विधान करून त्यांनी आठवड्यातील सातही दिवस काम करण्याच्या विचारांचे समर्थन केले होते. त्यालाच दीपिका पादुकोनने विरोध केला आहे. तिने सुब्रमण्यम यांचा विरोध करून मानसिक स्वास्थ्याच्या महत्त्वाला अधोरेखित केलं आहे. 

दीपिका पादुकोनने केली चिंता व्यक्त

यशस्वी होण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस काम करण्याचा सल्ला सुब्रमण्यम यांनी दिला होता. याच सल्ल्यानंतर दीपिका पादुकोनने चिंता व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कामाच्या पद्धतीला विरोध केला आहे. तसेच सुब्रमण्यम यांच्यासारख्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे विधान येणे हे फारच धक्कादायक आहे, असंही तिने म्हटलंय विशेष मानसिक आरोग्य चांगले असणे हे फार महत्त्वाचे आहे, असंही तिने या स्टोरीमध्ये म्हटलंय. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

 गुरुवारी लार्सन आणि टुब्रोचे अध्यक्ष सुब्रमण्यमयांनी आठवड्यात 90 तास काम करण्याच्या विचाराचे समर्थन केले. आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले की,"मी तुम्हाला रविवारी कामाला लावू शकत नाही, याचा मला पश्चात्ताप होतो. मी तुमच्याकडून रविवारीही काम करून घेऊ शकलो असतो तर मला आनंद झाला असतो. तुम्ही घरी बसून करता तरी काय? तुम्ही तुमच्या पत्नीला किती वेळ पाहात बसणार?" असे विधान सुब्रमण्यम यांनी केल्याचा दावा केला जात आहे.

नारायण मूर्ती यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याचे समर्थन केले

सुब्रमण्यम यांच्या कथित विधानानंतर आता कामाचे तास आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील ताळमेळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2023 साली इन्फोसिसचे सहसंस्थाापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यात 70 तास काम करण्याचे समर्थन केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा काम करण्याचे तास आणि वैयक्तिक आयुष्यातील ताळमेळ हा वाद रंगला होता.  

दीपिका पादुकोन नुकतेच आई झाली

दरम्यान, दीपिका पादुकोन ही अभिनेत्री नुकतेच आई झाली आहे. तिचा सिंघम अगेन हा चित्रपट येऊन गेला. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला. या चित्रपटात तिने पोलिसाची भूमिका बजावली होती. याच वर्षी तिचा कल्की 2898 एडी हा चित्रपटही आला आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही ती दिसणार आहे. 

हेही वाचा :

युझवेंद्र चहलने पहिल्यांदा घटस्फोटाच्या चर्चेवर आपले मत उघडले, धनश्रीचा उल्लेख टाळला; म्हटलं मी एक…  

प्रसिद्ध अभिनेत्री हनी रोजचा बड्या उद्योगपतीवर लैंगिक छळाचा आरोप, पोलिसांनीही ‘त्याला’ ठोकल्या बेड्या

‘दंगल’ची दबंगगर्ल करतेय ‘या’ जन्टलमनला डेट? नाव वाचून आश्चर्य वाटेल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.