Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'या' मंत्रांचा जप; सूर्य देव होतील प्रसन्न
Idiva January 10, 2025 10:45 AM

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. पौष महिन्यात सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत ही धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत पवित्र मानली जाते आणि यादिवशी स्नान, दान आणि पुण्य कर्मांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या सणाला लोक घरच्या घरी खिचडी बनवतात, म्हणून या सणाला 'खिचडी सण' असेही म्हणतात. यंदा मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीला साजरा होणार आहे.

हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवतात? काय आहे श्रद्धा आणि परंपरा?

istock

या सणाचा सूर्य आणि शनि ग्रहाशी विशेष संबंध

धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला येतात. या कारणास्तव या सणाचा सूर्य आणि शनि ग्रहाशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य किंवा शनीची स्थिती कमजोर असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष मंत्रांचा जप केल्याने या ग्रहांचा आशीर्वाद मिळू शकतो. अशा परिस्थितीत हे मंत्र कोणते आहेत ते जाणून घेऊया.

हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला का बनवली जाते खिचडी? जाणून घ्या त्याचे पौराणिक महत्त्व

istock

"ओम अही सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते। अनुकंपाय मां भक्त्या, गृहनार्ग्य नमोस्तुते।"

या मंत्रांचा जप केल्याने सूर्य देव प्रसन्न होतील. सूर्याला जल अर्पण करताना या मंत्राचा जप केल्याने सूर्याचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुंडलीत त्याचे स्थान मजबूत होते.

हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी करु नका 'या' १० गोष्टी

"अद्यतेजसोतपन्नं राजतं विधिनिर्मतम्। श्रेयसे मम विप्रत्वं प्रतिग्रहेनदमुत्तम्।"

मकर संक्रांतीच्या दिवशी आदित्य मंडळ ब्राह्मणांना दान देताना या मंत्राचा जप केला जातो. याने व्यक्तीचे दोष दूर होतात आणि त्याचे भाग्य सूर्यासारखे तेजस्वी होते.

istock

"इंद्रम विष्णु हरिम हंसमार्क लोकगुरु विभूम। त्रिनेत्रम् त्र्यक्षरम त्र्यंगम त्रिमूर्ती त्रिगतिम शुभम्।"

या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला भगवान इंद्र आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी प्राप्त होते.

Makar Sankranti Rangoli 2025 : मकर संक्रांतीला काढा या सुंदर, आकर्षक रांगोळ्या

“ओम ह्रीं सूर्याय नमः”

हा सूर्यदेवाचा बीजमंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आरोग्यास लाभ होतो.

istock

“सूर्य शक्ती मंत्र: ओम सूर्याय आदित्यय श्री महादेवाय नमः”

हा सूर्य शक्ती मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढत आणि नकारात्मकता दूर होते.

हेही वाचा : Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय; घरात होईल धन-धान्यांचा वर्षाव

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.