पट्टणकोडोलीच्या लोकनियुक्त सरपंचांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; 'या' प्रकरणी ठरविले अपात्र
esakal January 10, 2025 04:45 PM

सरपंच कोळी यांनी निवडणूक होऊन दोन वर्षे झाली तरीही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवावे, अशी तक्रार रायगोंडा डावरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) (Pattankodoli Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी (Sarpanch Bhagyashree Koli) यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र (Scheduled Tribe Caste Certificate) मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी त्यांना अपात्र घोषित केले. रायगोंडा डावरे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये या विरोधात याचिका दाखल केली होती.

कोळी सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, निवडणूक लढविताना त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानुसार निवडून आल्यावर पुढील सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा असते; परंतु या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास सरपंचपदासाठीची व्यक्ती अपात्र ठरते.

सरपंच कोळी यांनी निवडणूक होऊन दोन वर्षे झाली तरीही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवावे, अशी तक्रार रायगोंडा डावरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना सरपंचपदी अपात्र असल्याचे घोषित करण्यात येत असल्याचे आदेश काढले. हा निर्णय मान्य नसल्यास त्याविरुद्ध पुणे विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात आदेश पारीत झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अपील दाखल करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय अमान्य आहे. आमच्याकडे पुरेशी कागदपत्रे असल्याने पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहे.

- भाग्यश्री कोळी, सरपंच

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.