How To Make Tilpoli Recipe: मकर संक्रातीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी खुसखुशीत तीळपोळी बनवू शकता. ही तीळपोळी बनवणे खुप सोपे आहे. तसेच घरातील मंडळी देखील आवडीने खातील. चला तर मग जाणून घेऊया तीळपोळी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
तीळपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्यतीळ
शेंगदाणे
गूळ
तूप
जायफळ
वेलची
गव्हाचे पीठ
सर्वात आधी कढई गरम करून त्यात तीळ चांगले भाजून घ्यावे. नंतर थंड करायला ठेवा. नंतर त्याच कढईत शेंगदाणे भाजून घ्यावे. नंतर थंड झालेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. नंतर किसलेला गूळ त्यात चांगले मिक्स करा. नंतर त्यात जायफळ आणि वेलची पावडर टाका. नंतर परत मिक्सरमध्ये चांगले बारिक करा. नंतर पोळीत सारण भरून तीळगूळ पोळी गरम तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यावी.