Maharashtra Weather Rising temperature, warning of unseasonal rain from Meteorological Department PPK
Marathi January 11, 2025 05:24 PM


गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा हा 10 अंशाच्या खाली गेला आहे. दिवसा गरमी आणि रात्री कडकडीत थंडी असे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. परंतु, आता राज्यातील तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागणार आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा हा 10 अंशाच्या खाली गेला आहे. दिवसा गरमी आणि रात्री कडकडीत थंडी असे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे. परंतु, आता राज्यातील तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Rising temperature, warning of unseasonal rain from Meteorological Department)

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार पाहायला मिळत आहे. तापमानात सतत होणाऱ्या बदलामुळे आता पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच, उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पश्चिम चक्रवतामुळे वातावरणात बदल होत असून, दक्षिण-पूर्व इराण आणि आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातही कमी उंचीवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा समन्वय होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Mumbai : 3 महिन्यांत अनधिकृत बांधकामे हटवा; महापालिकेचा अल्टिमेटम

प्रादेशिक हवामान केंद्रानुसार आज 11 जानेवारीला अवकाळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी तसेच बहुतांश महाराष्ट्रात तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर होती. तर मुंबईतही फक्त सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून दिवसभर कडक उन्हाच्या झळा लागत आहेत. यंदाच्या वर्षी मुंबईत नेहमीपेक्षा कमी थंडी पडली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये निराशा आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.