बऱ्याचदा आपण ग्लोइंग आणि तजेलदार त्वचेसाठी महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. या ब्युटी प्रॉडक्ट्सचे साइड इफेक्ट्स देखील असतात. या प्रॉडक्ट्समुळे आपली त्वचा ग्लोइंग आणि सुंदर होण्याऐवजी खराब होते. आरोग्याप्रमाणे आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या त्वचेसाठी टोनर खूप महत्वाचे असते.
टोनर तुमच्या त्वचेमध्ये तजेला आणण्याचे काम करत असते. शरीरासाठी जसे पाणी महत्वाचे असते. तसेच त्वचेसाठी टोनर खूप गरजेचे असते. टोनरमुळे आपल्याला त्वचेच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. बऱ्याचदा आपण टोनर बाहेरून आणतो. आज आपण जाणून घेऊयात घरी टोनर कसे बनवायचे.
गुलाबपाणी टोनरसाठी गुलाबपाणी आणि लिंबाचा रस घ्या. आता एक चमचा गुलाबपाण्यात काही थेंब लिंबाचा रस घालून मिक्स करा. आणि एका स्प्रे बाटलीत भरून दिवसातून दोनदा हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. हे टोनर नियमित लावल्याने त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसेल.
हे टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी आणि पुदिन्याची पाने घ्या. त्यानंतर काकडीचा रस काढून त्यात पुदिन्याची पाने कुटून घाला. हे टोनर काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवा. दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावा. हे टोनर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि मुरुमे कमी होतात.
हे टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम ग्रीन टी उकळून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध मिसळा. मिक्स करून झाल्यावर फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा. त्यानंतर तुम्ही हे टोनर नियमित देखील वापरू शकता. या टोनरमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म असल्याने त्वचेतील घाण देखील निघून जाते.
एक कप ग्रीन टी उकळून त्यात अॅलोवेरा जेल घाला. हे मिक्स करून झाल्यावर फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा. हे टोनर तुम्ही संध्याकाळी वापरू शकता. हे टोनर नियमित वापरल्यास तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि ताजेतवानेपणा मिळेल.
हेही वाचा : Milk Cream : दुधाची साय चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
संपादन : प्राची मांजरेकर