Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!
Marathi January 11, 2025 05:24 PM

Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व  आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली होती. मात्र घोषणा करूनही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. अखेर आज सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावर मकोका लावलाय. मात्र वाल्मिक कराडवर अजूनही मकोका लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराड सध्या खंडणी प्रकरणात अटकेत आहे. त्यामुळे खुनाच्या खटल्यातल्या आरोपींमध्ये त्याचा समावेश नसल्याने त्याच्यावर मकोका दाखल झालेला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.