पत्नी अचानक घरातून बाहेर पडली. पतीला पत्नी दुसर्या कुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आला संशय. काही वेळानंतर पत्नी घरी परतली. दोघांमध्ये टोकाचे भांडण, पतीला झाला राग अनावर अन् पत्नीच्या डोक्यात वार करून केली हत्या. ही धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि गुन्हा लपवण्यासाठी पतीने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात पतीनेच अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आलीय.
हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केलीय. मृत महिलेचे नाव राखी पाटील (वय वर्ष २७) आहे. तर आरोपी पतीचे नाव सुरज पाटील (वय वर्ष ३४) आहे. या जोडप्यांना २ मुलं असून, दोन दिवसांपूर्वीच तुळजाई नगरमध्ये हे कुटुंब भाड्याच्या घरात राहायला गेले होते.
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीला संपवलं
काही दिवसांपूर्वी राखी घरातून बाहेर पडली. ती नेमकी कुठे, कशाला आणि कुणाला भेटायला गेली? याची माहिती पतीला नव्हती. राखी काही वेळानंतर घरी परतली. पतीला पत्नीचे कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. टोकाच्या भांडणात पतीचा राग अनावर झाला अन् त्यानं जड वस्तू थेट पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला जखमी केली. वार इतका जोरात बसला की, पत्नीचा जागीच झाला.
हत्येनंतर सुरज राखीला घेऊन खासगी दवाखान्यात गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात पतीची चौकशी केली असता, पोलिसांना सुरजने सांगितले की, पत्नी इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून पडली. परंतू, घटनास्थळी रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर राखीचा मृत्यू तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे नसून, डोक्यावर वार केल्यामुळे झाले असल्याचं तपासात स्पष्ट झालं.
हत्येनंतर पती आपल्या मुलांसह पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी काही तासातच त्याला पकडले. आरोपीची पोलील कसून चौकशी करत असून, हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरूवात केली आहे.