१३ वर्षांची साध्वी, व्हायचं होतं IAS, महाकुंभला जाताच बनली संन्यासी
esakal January 11, 2025 07:45 PM
13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh 13 वर्षांच्या साध्वीचा संन्यास

उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ सुरु होणार आहे. यात आता १३ वर्षांच्या साध्वीला संन्यास घ्यायला लावल्यानं तिचे गुरु अडचणीत आले आहेत.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh महाकुंभमधून काढलं बाहेर

साध्वी गौरी गिरी आणि गुरु कौशल गिरी यांना या वादानंतर महाकुंभमधून बाहेर घालवण्यात आलंय. मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh आखाडा पंचायतीचा निर्णय

आखाडा पंचायतीत चर्चा झाल्यानंतर गुरु कौशल गिरीसह १३ वर्षीय साध्वीलाा महाकुंभमधून बाहेर काढण्यात आलं. तिने संन्यास घेतल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh साध्वी गौरी गिरी

राखी उर्फ साध्वी गौरी गिरी असं तिचं नाव आहे. राखीसोबत तिची बहीणसुद्धा आखाड्यात आली होती.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh व्हायचं होतं आयएएस

कुंभ मेळ्यात आग्र्यातील पेठा व्यापारी त्यांच्या कुटुंबियांसह आले होते. आयएएस बननण्याची इच्छा असलेल्या राखीने अचानक संन्यास घेण्याची इच्छा बोलून दाखवली.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh कुटुंबाने सोपवलं संतांकडे

राखीच्या कुटुंबियांनी तिला जुना आखाड्याचे संत कौशल गिरींकडे सोपवलं. कौशल गिरींनी राखीला साध्वी गौरी गिरी असं नाव दिलं.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh संन्यास घेतला मागे

दरम्यान, राखीने संन्यास घेतल्यासारखी बातमी व्हायरल होताच आखाडा पंचायतीने कारवाई केली. तसंच तिला सन्यास मागे घ्यायला लावला.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh महाकुंभमध्ये साध्वींचा सहभाग

महाकुंभ २०२५ची तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. या कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने संत, महंत दाखल होत आहेत. अनेक साध्वीही महाकुंभ सोहळ्यात सहभागी होतात.

13-Year-Old Girl Aspires to Be IAS Becomes Sannyasi at Maha Kumbh संन्यास घेण्यासाठी नवा नियम

आखाडा बैठकीत साध्वींच्या संन्यास घेण्याबाबत नवा नियम करण्यात आलाय. २२ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांना साध्वी संन्यास घेता येणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.