Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हतेप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय. प्रतिक घुले, महेश सुदर्शन सांगळे, विष्णू चाटे याच्यासह सात आरोपींवर मोक्का (मकोका) लावण्यात आलाय. बीड पोलिसांनी सात आरोपींवर मोक्का लावलाय. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेय.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभरानंतरही आरोपींवर कारवाई न केल्यामुळे जनआक्रोश मोर्चे निघाले. बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. आज सात आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय.
कोणत्या सात आरोपींवर मोक्का ? सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे या आरोपींवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या आरोपात अटक आहे, पोलिस त्याचा तपास करत आहेत. कृष्णा आंधळे फरारच -संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटलाय, पम मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक कऱण्यात आले आहे. फरार कृष्णा आंधळे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैणात आहेत. कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देत आहे. आंधळे याची बँक खाते फ्रिज करण्यात आली आहेत, त्याशिवाय त्याच्या निकटवर्ती लोकांचीही चौकशी केली जात आहे.
संतोष देशमुख यांच्या मुलीची सरकारला विनंती
संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासात नेमकं चाललय काय? तपास कुठपर्यंत आलाय? काहीही माहिती मिळत नाही. संतोष देशमुख कोणता करण्याच्या तपासाची माहिती आमच्यासह संपूर्ण राज्याला द्यायला हवी, अशी विनंती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सरकारकडे केली.
माझे वडील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन एक महिना झाला या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही या प्रकरणात नेमकं चाललय काय तपास कुठपर्यंत आलाय हे देशमुख कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवे ही माझी विनंती आहे.. या गुन्ह्यातील तपासाबाबत वेळोवेळी आम्हाला माहिती द्यावी अशी विनंती संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने केली आहे..