भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात आगामी 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे. दरम्यान भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) जवळजवळ 14 महिन्यांनी भारतीय संघात परतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी शमीला संधी दिली आहे.
भारत-इंग्लंड टी20 मालिकेची सुरूवात (22 जानेवारी) पासून होणार आहे. त्यामध्ये शमी खेळताना दिसेल. पण यासोबतच एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, शमी इंग्लंडविरूद्धचे सर्व टी20 सामने खेळणार नाही.
मोहम्मद शमीने (Mohammed Shami) भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला. हा वनडे सामना होता. त्याच वेळी, शमीने नोव्हेंबर 2022 मध्ये त्याचा शेवटचा टी20 सामना खेळला. आता तो सुमारे 14 महिन्यांनी भारतीय संघात परतला आहे. तो दुखापतीमुळे त्रस्त होता. बरे झाल्यानंतर, तो देशांतर्गत सामने खेळला आणि शानदार कामगिरी केली.
खरेतर, भारताला टी20 मालिकेनंतर इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकाही खेळायची आहे. यानंतर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होईल. त्यामुळे शमीलाही वनडे संघात देखील स्थान मिळू शकते. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, शमीच्या कामाचा ताण लक्षात घेता त्याला ब्रेक दिला जाऊ शकतो. यामुळे तो 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे तयार होईल. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
इंग्लंडविरूद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई
भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
22 जानेवारी – पहिला टी20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरा टी20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट (सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी – चौथा टी20, पुणे (सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवा टी20, मुंबई (सायंकाळी 7 वाजता)
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकने रचला इतिहास, SA20 लीग खेळणारा ठरला पहिलाच भारतीय
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी रविंद्र जडेजाचे स्थान धोक्यात, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर ‘या’ 3 दिग्गजांची दमदार कामगिरी