नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण हे जबाबदारी सांभाळणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. लवकरच चव्हाण बावनकुळे यांच्याकडून जबाबदारी स्विकारतील.