भारतीय समाज हा विविध जाती-धर्मांचा समावेश असलेला समाज आहे.
Bigamyभारतात पूर्वी पुरुष मंडळी अनेक महिलांशी लग्न करायचे पण त्यावेळी विवाहासंबंधी कायदे कानून नव्हते.
Bigamyआता स्वतंत्र भारतात प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉ अस्तित्वात आहेत. तसंच सर्वांसाठी असा फौजदारी कायदाही आहे.
Bigamyहिंदू विवाह कायदा १९५५च्या कलम १७ अंतर्गत पुरुषानं किंवा महिलेनं लग्न झालेलं असताना अन् त्यातून कायदेशीरित्या मुक्त झालेलं नसताना दुसरं लग्न करणं गुन्हा आहे.
Bigamyजर या कायद्याचं उल्लंघन झालं तर ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
Bigamyपण असं असतानाही आपल्याला आपल्या आजुबाजुला दोन बायका असलेले अनेक पुरुष दिसतात. असे दोन बायका असलेले अनेक पुरुष मंडळी राजकारणातही आहेत.
Bigamyपण तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न आपल्याला पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
Bigamyखरंतर दुसरं लग्न करणं हा गुन्हा असला तरी तो अदखलपात्र गुन्हा समजला जातो. त्यामुळं पहिल्या बायकोनं तक्रार केल्याशिवाय पोलीस यामध्ये कारवाई करत नाहीत.
Bigamyपण जर पहिल्या बायकोनं साधी तक्रारही दिली तर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं बंधनकारक असतं.
Bigamyआयपीसीच्या कलम ४९४ अंतर्गत एकाचवेळी दोन विवाहांची व्याख्या करण्यात आली आहे.